मिशाला पीळ, माथाडीला पीळ अन् नंतर गीळ; उदयनराजेंचा नरेंद्र पाटलांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 03:32 PM2019-04-14T15:32:10+5:302019-04-14T15:40:33+5:30

‘मिशाला पीळ, माथाडीला पीळ आणि नंतर गीळ हा प्रकार सुरू असून, त्यांच्या चर्चेचं मी आव्हानं स्वीकारतो. त्यांना गाठायचं असेल तुर कुठेही गाठू शकतो; पण सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही,’

Udayanraje's attack on Narendra Pawar | मिशाला पीळ, माथाडीला पीळ अन् नंतर गीळ; उदयनराजेंचा नरेंद्र पाटलांवर हल्लाबोल

मिशाला पीळ, माथाडीला पीळ अन् नंतर गीळ; उदयनराजेंचा नरेंद्र पाटलांवर हल्लाबोल

Next

सातारा - ‘मिशाला पीळ, माथाडीला पीळ आणि नंतर गीळ हा प्रकार सुरू असून, त्यांच्या चर्चेचं मी आव्हानं स्वीकारतो. त्यांना गाठायचं असेल तुर कुठेही गाठू शकतो; पण सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही,’ असा हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यावर नाव न घेता केला. 

सातारा येथे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी निर्धारनामा जाहीर केला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना हे उत्तर दिले. नगराध्यक्षा माधवी कदम, अ‍ॅड. दत्ता बनकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.  

खासदार उदयनराजे यांनी पाच वर्षांत करण्यात येणाºया कामांचा निर्धारनामा जाहीर केला. यावेळी त्यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आपल्यावर टीका केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा उदयनराजेंनी त्याला प्रत्युत्तर दिले. 

महसूलमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर उदयनराजे म्हणाले, ‘मी मनानं राजाच आहे. ते पदवीधरमधून निवडणूक लढवत होते. त्यावेळी आम्ही त्यांना मतदान केली व ते निवडून आले. त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन आता बदललाय.’ शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उदयनराजे म्हणाले, ‘ते माझ्याशी देखणा आहे म्हणून चर्चेला बोलवतात की काम आहे म्हणून. माझी दहशत नाही. त्यांचं हे माकड चाळं आहेत.’ 

खासदार उदयनराजेंच्या जाहीरनाम्यात शेती, सिंचन आणि भारनियमन हे शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे राहिले आहेत. शेतीवर उदरनिर्वाह करणारे ८० टक्के शेतकरी आहेत. त्यांना सक्षम बनविण्याची सर्वांचीच जबाबदारी असून, तसे होत नाही, ही शोकांतिका आहे. शेतक-यांसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताºयात होणार असून, आचारसंहितेनंतर त्याचे काम सुरू होईल. सातारा रेल्वे स्टेशन चांगले करण्याचा प्रयत्न आहे. तसेच साताºयात कृषी विद्यापीठ आणण्याचा मानस पाच वर्षांत पूर्ण होईल, असेही उदयनराजेंनी यावेळी सांगितले. 

तसेच या निर्धारनाम्यात रस्ते व दळवणवळण, पासपोर्ट कार्यालय, शैक्षणिक सुविधा, आरोग्य, कास धरण, औद्योगिक विकास, बेरोजगारांना रोजगार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि पर्यटन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साताºयात भव्य स्मारक, कला आणि क्रीडाचा विकास आदींवर काम करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Udayanraje's attack on Narendra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.