नागपूरजवळ दोन अपघातात महिलेसह दोघे ठार, दोन किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 07:54 PM2017-11-12T19:54:56+5:302017-11-12T19:58:48+5:30

गिट्टीखदान आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.४५च्या दरम्यान हे अपघात घडले.

Two people were killed and two minor injured in two accidents near Nagpur | नागपूरजवळ दोन अपघातात महिलेसह दोघे ठार, दोन किरकोळ जखमी

नागपूरजवळ दोन अपघातात महिलेसह दोघे ठार, दोन किरकोळ जखमी

Next
ठळक मुद्देगिट्टीखदान आणि यशोधरानगरात अपघातभरधाव ट्रकच्या चालकाने मागून अ‍ॅक्टिव्हाला मारली जोरदार धडक दुसऱ्या अपघातात दुचाकीला समोरून जोरदार धडक

नागपूर : गिट्टीखदान आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.४५च्या दरम्यान हे अपघात घडले.


राज्य राखीव दल गट क्रमांक ४ मध्ये कार्यरत असलेले प्रेमदास भागवत राऊत (वय २९) हे शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास त्यांच्या सासू शकुंतलाबाई लक्ष्मणराव खोरगडे (वय ६८) यांना घेऊन अ‍ॅक्टिव्हाने जात होते.

गोरेवाडा फॉरेस्ट गेटसमोर भरधाव ट्रक (सीजी ०४/ जी ६९५९)च्या चालकाने मागून अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक मारली. त्यामुळे शकुंतलाबाई खाली पडून गंभीर जखमी झाल्या.

त्यांना मेयोत डॉक्टरांनी मृत घोषित केले. जुजबी जखमी झालेल्या राऊत यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.


दुसरा अपघात यशोधरानगरातील एकता कॉलनीत शनिवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास घडला. अब्दुल लतिक अन्सारी (वय ५५, रा. योगी अरविंदनगर) हे त्यांच्या पत्नीसह मोटरसायकलने जात होते.

एनआयटी गार्डनसमोर होंडा पॅशन मोटरसायकलच्या दुचाकीचालकाने अब्दुल लतिक अन्सारी यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक मारली. त्यामुळे ते खाली पडून गंभीर जखमी झाले तर पत्नीला किरकोळ दुखापत झाली. लतिक यांना मेयोत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अब्दुल रहमान अब्दुल अशपाक (वय ४२) यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी दुचाकीचालकाचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Two people were killed and two minor injured in two accidents near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.