जळगाव विमानतळावर मुक्त संचार करणारे दोन बिबटे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:53 PM2019-06-14T19:53:24+5:302019-06-14T19:55:05+5:30

या बिबट्यांमुळे महिनाभरापासून विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. 

Two leopards were caught in the Jalgaon airport | जळगाव विमानतळावर मुक्त संचार करणारे दोन बिबटे जेरबंद

जळगाव विमानतळावर मुक्त संचार करणारे दोन बिबटे जेरबंद

Next

जळगाव : जळगाव विमानतळावर मुक्त संचार करणारे आणि पिंजरा लावूनही वनविभागाला हुलकावणी देणारे दोन  बिबटे शुक्रवार, १४  रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास एकाच पिंजºयात अडकले. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनीची सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बिबट्यांमुळे महिनाभरापासून विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. 
जळगाव विमानतळावर दोन बिबटे आढळून आले होते. विमानतळाचा परिसर सुमारे ७५० एकरचा  असल्याने त्यात कॅमेरा ट्रॅप लावूनही बिबट्या लवकर हाती लागणे अवघड होते. तरीही ११ मे रोजी वनविभागाने एक बिबट्या पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले होते.  मात्र विमानतळाला अनेक ठिकाणी चोरवाटा असल्याने बिबट्या पुन्हा विमानतळावर दाखल झाला होता. 
या दोन बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने  दोन पिंजरे लावले होते. मात्र  बिबटे पिंजºयात सापडत नव्हते. शेवटी १४ रोजी पहाटे ३ वाजता हे दोन्ही बिबटे एकाच पिंजºयात अलगद अडकले.  त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे यांनी तपासणी केली असता  दोन्ही बिबटे सृदृढ असल्याचे व  त्यांना कोणतीही ईजा झाली नसल्याचे आढळून आले.

Web Title: Two leopards were caught in the Jalgaon airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.