ही दोस्ती तुटायची नाय, सहकाऱ्याच्या मृत्यूचा विरह सरड्याला सहन होईना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 10:12 PM2017-07-25T22:12:43+5:302017-07-25T22:13:50+5:30

अनंत जाधव  सावंतवाडी, दि. 25 - आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य ज्या प्रमाणात शोकसागरात बुडतो, तसाच शोक हा  पशु-पक्षी प्राणी ...

True Friend's | ही दोस्ती तुटायची नाय, सहकाऱ्याच्या मृत्यूचा विरह सरड्याला सहन होईना

ही दोस्ती तुटायची नाय, सहकाऱ्याच्या मृत्यूचा विरह सरड्याला सहन होईना

googlenewsNext

अनंत जाधव 
सावंतवाडी, दि. 25 - आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य ज्या प्रमाणात शोकसागरात बुडतो, तसाच शोक हा  पशु-पक्षी प्राणी यांना होत असतो. पण प्राणीमात्रांचा शोक कुणाला दिसत नाही. तसाच काहीसा प्रकार आंबोली-फौजदारवाडीत घडला. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूमुळे व्यथित झालेला सरडा मृत सरड्याच्या बाजूला तासन्तास पडून होता. अनेक वाहने आजूबाजूला आली, पण तो सरडा काही मृत सरड्याच्या बाजूला होता तो हलत नव्हता. त्यामुळेच प्राणीमात्र मुकी असली तरी ''ये दोस्ती तुटायची नाय" असे म्हणत असतील, हेच यातून दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीकडे पाहिले जाते. तर चेरापुंजीनंतरचा जास्त पाऊस आंबोलीत पडत असतो. येथे अनेक वेगवेगळ््या जातीचे जिवंत प्राणी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. त्यातीलच एका प्राण्याची सहकाऱ्याबद्दलची भावना घेण्यासारखी आहे. आंबोली-फौजदारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध सोमवारी सकाळी एक सरडा मृत अवस्थेत पडला होता. तर त्याच्या बाजूला एक सरडा जिवंतपणे त्या मृृत सरड्याची राखण करीत होता. या सरड्याच्या आजूबाजूूने अनेक वाहने ये-जा करीत होती. पण जिवंत सरडा काही केल्या मृत सरड्याकडून हालत नव्हता. एकटक मृत सरड्याकडे पाहत होता. कदाचित त्याला त्याचे दु:ख कुणाला सांगता येत नव्हते आणि लपवताही येत नव्हते. त्यामुळे त्या मृत सरड्याच्या जवळून त्याला न्याहाळत आपल्या आठवणी जाग्या करीत असावा, असे वाटत होते.
अनेक वेळा मनुष्य मृत झाला की त्याचे सहकारी नातेवाईक आपले दु:ख व्यक्त करीत असतात. आपले मन हलके करतात.

{{{{dailymotion_video_id####x845919}}}}

Web Title: True Friend's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.