विठ्ठल दर्शनाच्या व्हीआयपी पाससाठी पैसे घेतले; अधटराव यांना तीन दिवस पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 07:18 PM2018-09-02T19:18:46+5:302018-09-02T19:19:43+5:30

कैलास डोके व विजय देवमारे या दोघांना पंढरपूर पोलिसांनी शनिवारी अटक केली होती.

took money for a VIP pass; Three days police detention to adhvatrav | विठ्ठल दर्शनाच्या व्हीआयपी पाससाठी पैसे घेतले; अधटराव यांना तीन दिवस पोलिस कोठडी

विठ्ठल दर्शनाच्या व्हीआयपी पाससाठी पैसे घेतले; अधटराव यांना तीन दिवस पोलिस कोठडी

Next

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनचा व्हीआयपी पास देण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांना पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले.  यावेळी न्यायालयाने पुढील तपासासाठी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.


पैसे घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडववल्या प्रकरणात कैलास डोके व विजय देवमारे या दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. या प्रकरणात मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. यामुळे शनिवारी रात्री सचिन अधटराव यांना पोलिसांनी अटक केली होती.


विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी मंदिर परिसरातील मंदिर परिसरात हार विक्रेते कैलास डोके व विजय देव मारे यांच्यामार्फत आणखी किती जणांकडून दर्शनासाठी पैसे घेतलेले आहेत, तसेच आणखीन कोणाकोणाच्या मार्फत दर्शन पास विक्री केलेली आहे. दर्शन पाससाठी घेण्यात आलेले पैसे बँक खात्यातून घेतले किंवा रोख घेतले याची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सचिन अधटराव यांना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यामुळे न्यायालयाने सचिन अधटराव यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: took money for a VIP pass; Three days police detention to adhvatrav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.