कोल्हापूरचा टोललढा हा भांडवलशाहीवरील विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 01:01 AM2018-01-21T01:01:05+5:302018-01-21T01:04:00+5:30

कोल्हापूरचा टोलविरोधातील यशस्वी लढा हा विकृत भांडवलशाहीवरील मोठा विजय आहे, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी ‘लोकमत’ कोल्हापूरचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ‘कोल्हापूरचा टोललढा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्य्क्त केले.

Tolalha of Kolhapur is a victory over capitalism | कोल्हापूरचा टोललढा हा भांडवलशाहीवरील विजय

कोल्हापूरचा टोललढा हा भांडवलशाहीवरील विजय

Next

कोल्हापूर : कोल्हापूरचा टोलविरोधातील यशस्वी लढा हा विकृत भांडवलशाहीवरील मोठा विजय आहे, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी ‘लोकमत’ कोल्हापूरचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ‘कोल्हापूरचा टोललढा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्य्क्त केले.
‘जनआंदोलनांचे भवितव्य काय?’ या विषयावर मांडणी करताना चौधरी म्हणाले, कोल्हापूरने जो संघर्ष उभारला, तसा संघर्ष पुण्या-मुंबईत उभारणार नाही. हे सामूहिक कर्तृत्व कालांतराने विस्मरणात जाते. इथे आयआरबी कंपनी, अधिकारी आणि मंत्री यांची युती असतानाही लोक जिंकले, हे या लढ्याचे वैशिष्ट्य आहे. रत्नागिरीसारख्या एका जिल्ह्यात ४0 थर्मल पॉवर प्लांट उभारले जातात, याची चर्चा व्हायला हवी. मात्र जमिनीचे भाव ठरले की प्रकल्प सुरू झाला, हे बंद व्हायला हवे. समृद्धी महामार्गात नेते, आयएएस अधिकाºयांनी आधी जमिनी घेऊन नंतर त्या शासनाला विकून टाकल्या. नियोजन हे टेंडरकेंद्री झाल्याने हा सर्व घोटाळा होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, अनेक क्रांत्या या कराला विरोध दर्शविण्यासाठीच झाल्या असून, लोकलढा कसा असावा याचे उत्तम प्रारूप कोल्हापूरच्या टोललढ्याने समोर ठेवले आहे.

Web Title: Tolalha of Kolhapur is a victory over capitalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.