एसटीची वेतनवाढीसाठी आज ‘रंगीत तालीम’, न्यायालयात अंतरिम वाढीचा अहवाल होणार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:40 AM2017-11-15T03:40:53+5:302017-11-15T03:41:08+5:30

एसटी कर्मचा-यांच्या वेतनप्रकरणी महामंडळ अंतरिम वाढीचा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर करणार आहे. या अहवालात एसटीची आर्थिक स्थिती आणि

 Today, 'Rangit Talim' will be submitted for the increase of ST's salary, report will be submitted to the court | एसटीची वेतनवाढीसाठी आज ‘रंगीत तालीम’, न्यायालयात अंतरिम वाढीचा अहवाल होणार सादर

एसटीची वेतनवाढीसाठी आज ‘रंगीत तालीम’, न्यायालयात अंतरिम वाढीचा अहवाल होणार सादर

Next

मुंबई : एसटी कर्मचा-यांच्या वेतनप्रकरणी महामंडळ अंतरिम वाढीचा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर करणार आहे. या अहवालात एसटीची आर्थिक स्थिती आणि कर्मचा-यांच्या अंतरिम वाढीची आकडेवाडी सादर होणे अपेक्षित आहे. २२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे अंतरिम वाढ देण्यासंदर्भातील अहवाल म्हणजे वेतनवाढीसाठी ‘रंगीत तालीम’ असल्याची चर्चा एसटी वर्तुळात आहे.
२३ आॅक्टोबरला न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढ व एसटीच्या आर्थिक स्थितीसंदर्भातील अहवालासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. समिती सदस्यांनी ‘अहवाल थेट न्यायालयातच सादर करू’, अशी भूमिका घेतल्याने कर्मचा-यांचे लक्ष न्यायालयाकडे असणार आहे.

Web Title:  Today, 'Rangit Talim' will be submitted for the increase of ST's salary, report will be submitted to the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.