हृदयद्रावक! गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, चिमुकली बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 09:20 PM2019-07-07T21:20:22+5:302019-07-08T15:39:26+5:30

गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हारमध्ये घडली.

Tired of poverty, the entire family committed suicide | हृदयद्रावक! गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, चिमुकली बचावली

हृदयद्रावक! गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, चिमुकली बचावली

Next

 - हुसेन मेमन 

जव्हार - गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हारमध्ये घडली. जूनमध्ये कुटुंबाचा आधार गेला नवऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर रुक्षणा हिने स्वत: चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा या विवंचनेतून ३ वर्षीय मुलही दीपाली आणि ७/८ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून आपली जीवन यात्रा संपवली मात्र चिमुकली वृषाली वाचली.  

याबाबत लक्षमी अमृत टोकरे ( मृत रुक्षणाची आई) हिने दिलेल्या फिर्यादी वरुन ५ जुन रोजी रुक्षिणा वय ३० हिने ( खरोंडा) कोणते तरी विष स्वतः आणि दोन्ही मुलीना पाजले यामध्ये मोठी मुलगी आणि रुक्षिणा हिचा मृत्यू झाला तर कहि महीण्यांची चिमूकली मात्र बचावली असली तरी ती जव्हार कुटीर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.   जूनमध्ये कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर जगायचे कसे हाताला रोजगार नाही, मुलीना जगवायचे कसे, या प्रश्नातून या सर्व कुटुंबानेच आत्महत्या केल्याने तशी नोंद जव्हार पोलिसांत करण्यात आली आहे. 

 रोजगात हमी, घरकुल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना सरकार आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत त्या कागदावरच कशा राहतात हे या घटनेवरून समोर आले असून, या अत्महत्येस जबाबदार सर्वच यंत्रणा प्रमुखावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Tired of poverty, the entire family committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.