थरारक ! वाळू माफियाने २ तलाठ्यांचे अपहरण करून त्यांना धावत्या टिपरमधून ढकलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 04:04 PM2017-09-24T16:04:24+5:302017-09-24T16:43:33+5:30

जप्त केलेले वाळूचे टिपर राजूर येथून तहसील कार्यालयात घेऊन जात असलेल्या २ तलाठ्यांचे वाळू माफियांनी अपहरण केले व त्यांना धावत्या गाडीतून ढकलत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ८ च्या दरम्यान जवखेडा ठोंबरे जवळ झालेल्या या थरारक घटनेत दोन्ही तलाठी सुख्ररूप आहेत. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी चालक सर्जेराव चव्हाण याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

Thrilling! The sand mafia abducted two Talathi and pushed them from the tipper | थरारक ! वाळू माफियाने २ तलाठ्यांचे अपहरण करून त्यांना धावत्या टिपरमधून ढकलले 

थरारक ! वाळू माफियाने २ तलाठ्यांचे अपहरण करून त्यांना धावत्या टिपरमधून ढकलले 

googlenewsNext

भोकरदन ( जालना ) , दि. 24 : जप्त केलेले वाळूचे टिपर राजूर येथून तहसील कार्यालयात घेऊन जात असलेल्या २ तलाठ्यांचे वाळू माफियांनी अपहरण केले व त्यांना धावत्या गाडीतून ढकलत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ८ च्या दरम्यान जवखेडा ठोंबरे जवळ झालेल्या या थरारक घटनेत दोन्ही तलाठी सुख्ररूप आहेत. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी चालक सर्जेराव चव्हाण याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

या बाबत भोकरदन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीलदार संगीता कोल्हे यांच्या पथकाने आज सकाळी ७ च्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. यात राजूर येथील चौफुलीवर त्यांनी एका टिप्परला ( एमएच २० बीटी १९२५ ) ३ ब्रास अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले. यावेळी तलाठी भागवत जाधव व रामेश्वर कांबळे हे जप्त केलेल्या टिप्परला पुढील वर कारवाईसाठी चालकासह भोकरदन येथे घेऊन निघाले. काही अंतरावर अचानक एका जीपने टीपरचा रस्ता अडवला व त्यामधून आलेल्या व्यक्तीने दोन्ही तलाठ्यांना जीवे मारण्याची धमकी देत खाली उतरण्यास सांगितले. यावर दोन्ही तलाठी धमकीला न जुमानता  टीपरमध्येच बसून राहिले. यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने चालकाला खाली उतरवत टिपरचा ताबा घेतला व भरधाव वेगात टिपरला बरंजळा रोडवर नेले. या दरम्यान तहसीलदार कोल्हे यांचे पथक टिपर मागेच असल्याने त्यांनी हा प्रकार पाहून भोकरदन पोलिसांना मदत मागीतली.

यानंतर या चालकाने  टिपर भरधाव वेगात चालवत जवखेडा ठोंबरे या गावाजवळ एका बाईक स्वारास हूल दिली, पुढे एका मुलीला व बैलगाडीला उडवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान टिपरमधील वाळू रस्तावर टाकत चालकाने वेग अधिक वाढवला. दरम्यान, दोन्ही तलाठ्यांनी मोबाईल वरून तहसीलदार कोल्हे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना शिवीगाळ करत, मी टिपर खड्ड्यात घालून उडी मारेल व तुम्हाला जीव मारेल, तुमच्या तहसीलदारांनाही जीवे मारेल अशी धमकी दिली. यासोबतच त्यांना टिपर मधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांनी प्रसंगावधान राखत शिताफीने जीव वाचवला.

ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण 
हा सर्व प्रकार बालाजी लोखंडे या ग्रामस्थाने पाहिला असता त्याने जवखेडा गावच्या ग्रामस्थांना सावध करत टिपरला अडवण्यास सांगितले. ग्रामस्थांनी रस्त्यावर उभे राहत टिपरला थांबण्यास सांगितले असता चालकाने टिपर त्यांच्यावर घातले.परंतु , ग्रामस्थांनी रस्त्यावर दगड टाकलेले असल्याने टिपर पुढे जाऊ शकला नाही. यानंतर कोल्हे यांची गाडी हि पाठलाग करत तिथे पोहोंचली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला ताब्यात घेतले व त्याच वेळी पोहचलेल्या  सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस. सिरसाट यांच्या पथकाच्या स्वाधीन केले. यानंतर चालक सर्जेराव चव्हाण ( रा. मानदेऊळगाव ता. बदनापुर ) याला भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तहसीलदार कोल्हे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस. सिरसाट हे करत आहेत.

Web Title: Thrilling! The sand mafia abducted two Talathi and pushed them from the tipper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.