खुनानंतर तीन तास ‘ती’ मृतदेहाजवळच, अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:59 AM2018-03-23T11:59:30+5:302018-03-23T11:59:30+5:30

लग्नाच्या नावाखाली आपला विश्वासघात केल्यानेच त्याचा खून केल्याचे तिने मान्य केल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

Three hours after the murder, 'she' near the dead, the blood of youth through immoral relationships | खुनानंतर तीन तास ‘ती’ मृतदेहाजवळच, अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून

खुनानंतर तीन तास ‘ती’ मृतदेहाजवळच, अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून

ठाणे : अनैतिक संबंधांनंतर लग्नाला नकार देणाऱ्या कबीर अहमद लष्कर (२५) या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्यानंतर त्याच्याच मृतदेहाजवळ तीन तास बसून काढल्यानंतर भानावर आलेल्या रूमा बेगम लष्कर (२८) हिने बंगलोरला पळ काढला. तिला बंगलोरमधून ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले.
कबीर हा रूमा बेगम हिचा पती अन्वर हुसैन याच्या जिगनी (जि. अनिकल, कर्नाटक) येथील सायकल दुकानात नोकरीला होता.

त्यामुळेच त्याची आणि रूमा बेगमची ओळख झाली होती. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाल्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. दरम्यान, तो कर्नाटकातून ठाण्यात आला आणि घोडबंदर रोडवरील एका दुकानात नोकरीला लागला. ‘माझ्याशी लग्न करायचे असेल, तर कर्नाटकातील घरदार सोडून तू ठाण्यात ये’, असे त्याने तिला प्रलोभन दाखवले. ठरल्याप्रमाणे ती १६ मार्च रोजी ठाण्यात आली. मात्र, त्याने लग्नाला नकार दिला. १७ मार्च रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. याच रागातून तिने १८ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झोपेतच त्याच्या डोक्यात वीट टाकून त्याला जखमी केले. झोपेतून जाग आल्यावर तो तिला मारण्यासाठी झेपावल्यानंतर तिने चाकूने त्याच्या गुप्तांगावर वार केला.

नंतर, गळाही आवळला आणि तो जिवंत राहू नये म्हणून उंदीर मारण्याचे औषधही त्याच्या तोंडात कोंबले. या झटापटीत त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे खुनानंतर त्याच्या मृतदेहाजवळ पहाटे ५ वाजेपर्यंत तिने बसून काढले. भानावर आल्यावर स्वत:च्या रक्ताचे डाग पुसण्यासाठी अंघोळ करून पहाटेच त्याचे घर सोडले. ठाण्यातून पुणेमार्गे बंगलोर येथून जिगनी गावी परतल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. कबीरला त्याच्या ठाण्यातील सायकल दुकानाचा मालक शोधत त्याच्या घरी आला, त्यावेळी त्याचा खून झाल्याचे उघड झाले. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी आणि वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कैलास टोकले, उपनिरीक्षक रूपाली रत्ने, जमादार मधुकर कोठारे, हवालदार अंकुश पाटील आणि दीपक बरले यांच्या पथकाने थेट विमानाने बंगलोर गाठून अवघ्या काही तासांतच तिला अटक केली. सुरुवातीला या खुनाशी संबंध नसल्याचा दावा करणाºया रूमा बेगमने नंतर अखेर या खुनाची कबुली दिली.

कबीरने लग्नाच्या नावाखाली आपला विश्वासघात केल्यानेच त्याचा खून केल्याचे तिने मान्य केल्याचे उपायुक्त लोखंडे यांनी सांगितले. तिच्याकडून खुनातील चाकू आणि वीट हस्तगत करण्यात आली असून तिला सात दिवसांची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली आहे.

ओळख न पटण्यासाठी कागदपत्रे नेली...
खुनानंतर कबीरची कोणतीही ओळख पटू नये, म्हणून रूमा त्याचे आधार आणि पॅनकार्डही बंगलोरला जाताना घेऊन गेली. बंगलोरला पोहोचल्यानंतर आता आपल्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही, अशा आविर्भावात असतानाच पोलिसांनी पाठोपाठ विमानाने जाऊन पकडल्यानंतर मात्र तिला चांगलाच धक्का बसला.

कोणताही धागादोरा नसताना..
कबीर याचा खून झाल्यानंतर त्याचा खून एका महिलेने केल्याची शक्यता वर्तविली जात होती. तीन दिवसांपूर्वीच एक महिला त्याच्या घरी आली होती. इतकीच त्रोटक माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. विशेष म्हणजे बेंगलोर येथून आलेली रुमाबेगम यापूर्वी कधीही ठाण्यात आली नव्हती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तिला जेरबंद केले.

Web Title: Three hours after the murder, 'she' near the dead, the blood of youth through immoral relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.