कोपर्डी खटल्यातील दोषींना फाशीच हवी- अॅड. उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:45 AM2017-11-23T06:45:30+5:302017-11-23T06:46:28+5:30

अहमदनगर : कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खुनाची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने तीनही दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला.

Those convicted in the Kopardi case should be falsified - Ujjwal Nikam | कोपर्डी खटल्यातील दोषींना फाशीच हवी- अॅड. उज्ज्वल निकम

कोपर्डी खटल्यातील दोषींना फाशीच हवी- अॅड. उज्ज्वल निकम

Next

अहमदनगर : कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खुनाची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने तीनही दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला. शिक्षेवरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्याने न्यायालय आता २९ नोव्हेंबरला शिक्षेबाबत फैसला देणार आहे.
अ‍ॅड़ निकम म्हणाले, तिघा दोषींनी घटनेच्या दोन दिवस आधी अल्पवयीन मुलगी व तिच्या मैत्रिणीला रस्त्यात अडविले होते. ‘हिला कामच दाखवू’ असे ते म्हणाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीला रस्त्यात अडवून बलात्कार करून क्रूरपणे खून केला. भवाळ व भैलुमे यांनी बलात्कार व खून केला नसला तरी या कटात ते सहभागी होते. त्यामुळे तेही फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत.
>खटल्यातील दोषींना पश्चाताप नाही
युक्तिवादादरम्यान निकम म्हणाले, खटल्यातील तिनही दोषी प्रौढ आहेत. केलेल्या कृत्याचे परिणाम त्यांना माहिती होते़ त्यांच्या चेहºयावर पश्चाताप दिसत नाही़ मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने न्यायालयासमोर ‘शिक्षा एक दिवसाची काय आणि हजार दिवसांची काय’ असे उर्मट व उद्धट उत्तर दिले आहे. यावरुन दोषींची मानसिकता लक्षात येते.
नितीन भैलुमेच्या वकिलास धमकी
नितीन भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांना मंगळवारी रात्री अज्ञाताकडून फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
>इंदिरा गांधी हत्येच्या खटल्याचा संदर्भ
दोषींना फाशी देणे कसे योग्य आहे यावर युक्तिवाद करताना निकम यांनी १० खटल्यांचा संदर्भ दिला़ इंदिरा गांधी यांची दोन अंगरक्षकांनी हत्या केली. मात्र, या कटात सहभागी असणाºया केहरसिंग यालाही फाशीची शिक्षा झाली. संसदेवरील हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याने अफजल गुरुला फाशी झाली. कटात सहभागी असणे हाही त्या गुन्ह्याचाच भाग असल्याने कोपर्डीतही ते सूत्र लागू पडते, असे ते म्हणाले.

Web Title: Those convicted in the Kopardi case should be falsified - Ujjwal Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.