ठाण्यात उलटे टांगून मारल्याने चोरट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 06:41 AM2017-11-22T06:41:28+5:302017-11-22T06:41:47+5:30

ठाणे : चोरीच्या उद्देशाने सोमवारी पहाटे घरात शिरलेल्या शत्रुघ्न यादव (२२) याला कळव्यातील स्थानिक रहिवाशांनी बेदम चोप दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

Thiever death by hanging in tha | ठाण्यात उलटे टांगून मारल्याने चोरट्याचा मृत्यू

ठाण्यात उलटे टांगून मारल्याने चोरट्याचा मृत्यू

Next

ठाणे : चोरीच्या उद्देशाने सोमवारी पहाटे घरात शिरलेल्या शत्रुघ्न यादव (२२) याला कळव्यातील स्थानिक रहिवाशांनी बेदम चोप दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात गगनप्रसाद यादव (५२, रा. भास्करनगर, कळवा) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
भास्करनगर भागात गगनप्रसाद याचे तळ अधिक एक मजला असे चाळीतील घर आहे. त्यांच्या घरात शत्रुघ्न चोरीच्या उद्देशाने सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास शिरला. वरच्या मजल्यावरील गॅलरीत झोपलेल्या गगनप्रसाद याला त्याच्या पायाचा धक्का लागला. तेव्हा गगनप्रसादने आरडाओरडा केल्याने त्याने पहिल्या मजल्यावरून उडी मारली. तोपर्यंत घरातील इतर मंडळीही जागी झाली. खालच्या खोलीतून बाहेर पडलेल्या राजेंद्र (२६) या मुलाने शत्रुघ्नला पकडले. त्यापाठोपाठ पंचलाल यादव (३०) आणि जयहिंद उपाध्याय (४७) हेही आले. चोरीचा जाब विचारत त्यांनी शत्रुघ्नला बेदम मारहाण केली. त्यांच्यापैकी एकाने त्याला सरळ उलटा टांगला. नंतर बांबूने काळा-निळा होईपर्यंत जबर मारहाण केली. यामुळे शत्रुघ्न निपचित पडल्यानंतर त्यांच्यापैकीच एकाने पोलिसांना चोर पकडल्याची खबर दिली. पोलिसांनी त्याला आधी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याआघीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रकरण अंगलट येईल हे लक्षात आल्यावर यादव कुटुंबीयांनी किंवा चाळीतील कोणीही चोराला मारले नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला. अखेर पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर गगनप्रसाद आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत शत्रुघ्नचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. राजेंद्रसह चौघांना सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
>शत्रुघ्न यादव याच्याविरुद्ध यापूर्वीही कळवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. तो या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला असतानाच त्याने पुन्हा चोरीचा प्रयत्न केला.

Web Title: Thiever death by hanging in tha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.