तापीकाठी साकारतेय ‘चेतक टेन्ट व्हिलेज’! फेस्टिव्हलसाठी पर्यटन विभागाचा १० वर्षांचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:54 AM2017-12-01T04:54:20+5:302017-12-01T04:54:36+5:30

घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा आता ‘ग्लोबल फेयर’चे रूप घेत असून, त्यासाठी पर्यटन विभाग सरसावला आहे. या यात्रेनिमित्ताने खास ‘चेतक फेस्टिव्हल’ भरविण्यात येत असून, त्यासाठी पर्यटन विभागाने १० वर्षांचा करार करून निधीची तरतूद केली आहे.

 'Thetak Trent Village' by Tapti! Tourism Department's 10 year contract for the Festival | तापीकाठी साकारतेय ‘चेतक टेन्ट व्हिलेज’! फेस्टिव्हलसाठी पर्यटन विभागाचा १० वर्षांचा करार

तापीकाठी साकारतेय ‘चेतक टेन्ट व्हिलेज’! फेस्टिव्हलसाठी पर्यटन विभागाचा १० वर्षांचा करार

Next

- रमाकांत पाटील
नंदुरबार : घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा आता ‘ग्लोबल फेयर’चे रूप घेत असून, त्यासाठी पर्यटन विभाग सरसावला आहे. या यात्रेनिमित्ताने खास ‘चेतक फेस्टिव्हल’ भरविण्यात येत असून, त्यासाठी पर्यटन विभागाने १० वर्षांचा करार करून निधीची तरतूद केली आहे. यानिमित्ताने येणाºया विविध राज्यांतील व देशातील पर्यटकांसाठी तापी काठावर ‘चेतक टेन्ट व्हिलेज’ साकारले जात आहे.
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा प्रसिद्ध आहे. त्यानिमित्ताने भरणारा घोडेबाजार हा देशातील पाचव्या क्रमांकाचा आहे. आता पहिल्या क्रमांकावर भरारी घेण्यासाठी राज्य पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल व स्थानिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षापासून चेतक फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यंदाही या फेस्टिव्हलला व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन नियोजन केले आहे. ३ डिसेंबर २०१७ ते २ जानेवारी २०१८ असा महिनाभर हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. त्यासाठी महिनाभराकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यटकांसाठी तापी काठावर खास टेन्ट व्हिलेज उभारण्यात येत आहे. ७०पेक्षा अधिक व्हीआयपी टेन्ट येथे उभारण्यात येत असून, त्यात सर्व आलिशान सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय याच व्हिलेज कॅम्पसमध्ये स्पा सेंटर, डायनिंग हाउस, रिसेप्शन हाउस, क्लब यांसह अनेक सुविधा असणार आहेत.

पर्यटकांच्या मनोरंजनासाठी बोटिंग, स्पीडबोट, पॅरासेलिंग, पॅराग्लाइडिंग, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, हॉर्स राइडिंग यांसह अनेक सुविधाही असणार असल्याने यंदाचा फेस्टिवल हा लक्षवेधी ठरणार आहे.

Web Title:  'Thetak Trent Village' by Tapti! Tourism Department's 10 year contract for the Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.