विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 06:43 PM2018-02-14T18:43:52+5:302018-02-14T18:45:31+5:30

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अश्लिल वा आक्षेपार्ह मजकूर नाही, विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकामध्ये कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

There is nothing objectionable in the books selected for the students, Education Minister Vinod Tawadwane claimed | विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा

विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा

Next

मुंबई  - शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अश्लिल वा आक्षेपार्ह मजकूर नाही, विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकामध्ये कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांची खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, या पुस्तकांचे अद्यापही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करतानाच  तावडे म्हणाले की, महाराष्ट्र विद्या प्राधिकारण, पुणे यांच्यामार्फत पूरक वाचन पुस्तक योजनेतंर्गत नेमण्यात आलेल्या आशय समितीकडून या पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहे. विरोधकांनी जे पुस्तक काल दाखविले ते पुस्तक जुने असून ते कुंभमेळ्यामध्ये वाटण्यात आले होते. त्या पुस्तकांतील मजूकर विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या बाल नचिकेता या पुस्तकामध्ये समाविष्ट नसल्याचेही  तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. केवळ चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करण्याची विरोधकांना सवयच झाली असल्याचा टोलाही तावडे यांनी लगावला.

भारतीय विचार साधना कडून २० रुपयांची पुस्तके ५० रुपये किंमतीने खरेदी करण्यात आलेला विरोधकांचा आरोप खोडून काढताना श्री. तावडे यांनी स्पष्ट केले की, जी पुस्तक २० रु. दराने मिळत आहेत ती ब्लॅक ॲण्ड व्हाईट व लहान आकारात असून,  या पुस्तकाची छपाई साध्या कागदावर करण्यात आलेली आहे. तर ५० रुपयांची पुस्तके ही मोठ्या आकाराची असून,  त्यासाठी आर्ट पेपर चा व अधिक जाडीचा जीएसएम चा कागद वापरण्यात आलेला आहे, ही पुस्तके रंगीत व फोर कलर ची आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे फ्लिप कार्ट, ॲमेझॉन या ऑन लाईन वेबपोर्टल च्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या किंमती या आवृत्ती नुसार कमी-जास्त असतात, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेतंर्गत समितीने निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती राजा शिवाजी महाराज यांची सुमारे ३ लाख ५० हजार पुस्तके, डॉ.एपीजे अब्दुल कलाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या जीवनावरील सुमारे २ लाख पुस्तक, छत्रपती शाहू महाराज यांची सुमारे २ लाख पुस्तके यांच्यासह स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांच्यासह संत कबीर, संत मिराबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदींची ही पुस्तके समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्यामुळे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शीर्षकाची लाखो पुस्तके खरेदी करण्यात आलेला विरोधकांचा दावा निराधार असल्याचे ही तावडे यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनासाठी शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळी पुस्तक खरेदी केली जातात, यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असा हेतू असतो. विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकामध्ये संतकथा व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील पुस्तकांचाही यामध्ये समावेश असून, धार्मिक व पौराणिक पुस्तकेही निवडण्यात आलेली आहेत, असेही  तावडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: There is nothing objectionable in the books selected for the students, Education Minister Vinod Tawadwane claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.