ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 08:22 PM2019-05-14T20:22:58+5:302019-05-14T20:56:42+5:30

ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते...

There is no doubt about EVMs: Ajit Pawar | ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही : अजित पवार

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही : अजित पवार

Next
ठळक मुद्देनिवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक

पुणे: ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते. परंतु,काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक आहे,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची पुणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. बैठकीस खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण,शहराध्यक्ष चेतन तुपे,आमदार जयदेव गायकवाड , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.अजित पवार यांनी निवडणुकीबरोबरच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. 
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अजित पवार म्हणाले,केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष दुष्काळी भागांना भेट देणे गरजेचे आहे. मात्र,भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व मंत्री प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाण्यास घाबरत आहेत. कारण अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत, केवळ आचारसंहितेचा बाऊ करत आहेत. तसेच अनेक अधिकारी परदेश दौऱ्यावर गेले आहेत.
राज्य शासनाकडून प्रत्येक गोष्टीत अट घातली जात आहे.त्यामुळे हे सरकार अटीचे सरकार आहे,अशी टीका करत अजित पवार म्हणाले, सरकारकडून आरक्षणाला अट,चारा छावण्यांना अट,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाला अट घातली जात आहे. त्यातून कोणाचेही भले होणार नाही. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगांबाबत, ईमेल व डिजिटल कॅमेरा विषयी केलेले विधान हास्यास्पद असून ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांनाही न पटणारे आहे.
दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून चर्चा केली. दुष्काळ बाधितांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.

Web Title: There is no doubt about EVMs: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.