मराठवाड्यात १५ जुलैनंतर मोठ्या पावसाची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 06:44 PM2019-07-10T18:44:40+5:302019-07-10T18:53:38+5:30

मराठवाड्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल़..

there is hope for heavy rains In Marathwada after 15th of July | मराठवाड्यात १५ जुलैनंतर मोठ्या पावसाची आशा

मराठवाड्यात १५ जुलैनंतर मोठ्या पावसाची आशा

Next
ठळक मुद्देकोकणात अतिवृष्टीचा इशारा : चार दिवसानंतर पाऊस होणार कमीमराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस़ 

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़. पुढील चार दिवस कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल़. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात अनुकुल वातावरण असल्याने १५ जुलैनंतर मराठवाडा व विदर्भात जोरदार पाऊस होण्याची आशा असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपि यांनी सांगितले़. 
डॉ़ कश्यपि यांनी सांगितले की, कोकण, गोव्यात पुढील ४८ तासात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे़. ११, १२ व १३ हे तीन दिवस कोकणात सर्वदूर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असून नंतर उत्तर कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होईल़. मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे़.मराठवाड्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल़. त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होईल़ विदर्भातही पुढील चार दिवस काही काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे़. 
यंदा मॉन्सून उशिरा आल्याने सर्वत्रच पाऊस उशिरा सुरु झाला़. मराठवाड्यातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये नेहमीच उशिरा पाऊस होतो़. पण, यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्याने आणखी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे़. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालचा उपसागरात मॉन्सूनच्या दृष्टीने नकारात्मक वातावरण नाही़. त्यामुळे येत्या १५ जुलैनंतर मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले़. 
गेल्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ९०, चांदगड, ओझरखेडा ८०, आजरा, हरसुल, पेठे, शाहुवाडी ७०, जावळी मेधा, पन्हाळा ६०, दहीगाव, राधानगरी, सुरगाणा ५० मिमी पावसाची नोंद झाली़. याशिवाय अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़. 
मराठवाड्यात औंढा नागनाथ, कळमनुरी ५०, हिमायतनगर, माहूर ४०, हदगाव, हिंगोली, किनवट २०, आंबेजोगाई, भुम, कळंब, कन्नड, लातूर, सेनगाव, तुळजापूर, वाशी १० मिमी पाऊस झाला़. 
विदर्भात बुलढाणा ६०, देसाईगंज, कोर्ची, कुरखेडा, शेगाव ४०, अकोला, भामरागड, ब्रम्हपुरी, एटापल्ली, नागभिड, नांदुरा, रिसोड, सेलू, तिवसा ३० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला़
१० ते १३ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बºयाच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस 
इशारा : १० जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधाऱ ११ ते १३ जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ 
.............
गेल्या २४ तासात शिरगाव, ताम्हिणी २५०, दावडी २००, डुंगरवाडी १९०, जव्हार १८०, भिरा, मंडणगड, लोणावळा (कृषी) १७०, बेलापूर, खोपोली १५०, माथेरान, पेण, महाबळेश्वर १४०, अम्बोणे,  वळवण, पौड, उल्हासनगर, वाडा १३०, कोयना (नवजा), पोलादपूर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, विहार, तुलसी ११०, विक्रमगड, भोर, शिरोटा १०० मिमी पाऊस झाला होता़

Web Title: there is hope for heavy rains In Marathwada after 15th of July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.