ठाणे : हेरॉइनची तस्करी, ३९ लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:56 AM2017-10-13T04:56:22+5:302017-10-13T04:57:50+5:30

हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

Thane: smuggling heroin, handing over the goods worth 39 lakhs and arresting one | ठाणे : हेरॉइनची तस्करी, ३९ लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

ठाणे : हेरॉइनची तस्करी, ३९ लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

ठाणे : हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ३९२.५ ग्रॅम वजनाचे ३९ लाख २५ हजारांचे हेरॉइन हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अन्सारी हा हेरॉइन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्थानक परिसरात बुधवारी उपनिरीक्षक धर्मराज बांगर, हवालदार जगन्नाथ सोनवणे, महादेव चाबुकस्वार, नाईक बिपेश किणी, अमोल पवार आदींनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये हेरॉइन हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याने मध्य प्रदेशातून हे अमली पदार्थ आणल्याची कबुली दिली. मात्र, ते कोणाकडून आणले, कोणाला विकणार होता, त्याने यापूर्वीही अशी विक्री केली आहे का, या सर्व बाबींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
नशेची औषधे हस्तगत-
अन्य एका घटनेत साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने मुंब्रा भागातून १० आॅक्टोबर रोजी इरशाद मोहमद अझर खान याला मुंब्य्रातून अटक केली.
त्याच्याकडे विनापरवाना खोकल्यावरील फेन्सिरेक्स या औषधाच्या ८ हजार ५५० बॉटल्स औषध हस्तगत केल्या. या प्रकरणी खानविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Thane: smuggling heroin, handing over the goods worth 39 lakhs and arresting one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.