Thane: 30-year imprisonment for the accused in rape and murder of a school girl | ठाणे : शाळकरी मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपीला ३० वर्षाचा कारावास
ठाणे : शाळकरी मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपीला ३० वर्षाचा कारावास

ठाणे : शाळकरी मुलीला बाईकवर लिफ्ट देऊन निर्जन स्थळी नेऊन तिचा बलात्कार करीत तिची हत्या केली. या प्रकरणात वसई न्यायालयाचे  जिल्हा अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायाधीश एम पी दिवटे यांनी आरोपी राहुल गजानन तुंबडा (२४) याला दोषी ठरवीत ऐतिहासिक ३० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजाराचा दंड शुक्रवारी ठोठावला. 

राहुल गजानन तुंबडा (२४) रा. वसई येथील शारजामोरी गाव, जिल्हा शहापूर आरोपीचे नाव असून सदर प्रकरण  न्यायाधीश एम पी दिवटे यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. सरकारच्या वतीने न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांनी न्यायालयात युक्तीवादात म्हणाल्या १६ जानेवारी,२०१४ रोजी आरोपी तुंबडा याने कामन गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी इय्यतेत शिकणाऱ्या मुलीला घरी परत जाताना बाईकवर लिफ्ट दिली. आपण कुठे चाललो याचा गंधही मुलीला नव्हता. आरोपीने मुलीला बाईकवर बसवून एकेरी मार्ग असलेल्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून धूम ठोकली. मुलीचा मृतदेह हा १८ जानेवारीला पोलिसांना भेटला आणि आरोपी राहुल गजानन तुंबडा याला पोलिसांनी अटक केल्याचे सरकारी वकील मोहोळकर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयात तब्बल २१ साक्षीदार तपासले. मुलीचा मृत्यू हा डोक्याला गंहीर मर लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सरकारी वकिलांनी डीएनए आणि सीए तपासणीचा सबळ पुरावा झाला. 

निकालात न्यायधीश एम पी दिवटे यांनी न्यायालयात सादर पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरीत आरोपी राहुल तुंबडा याला शिक्षा ठोठावताना नमूद केले कि आरोपीच्या गुन्ह्यासाठी त्याला आयुष्यभर सश्रमाची शिक्षेची तरतूद आहे पण ती २० वर्षापेक्षा कमी नसावी असे नमूद करीत जन्मठेप आणि १० हजाराचा दंड ठोठावला. 


Web Title: Thane: 30-year imprisonment for the accused in rape and murder of a school girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.