दहा लाख शेतक-यांची आज होणार कर्जमुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 05:10 AM2017-10-18T05:10:53+5:302017-10-18T05:11:18+5:30

नरक चतुर्दशीच्या मुहुर्तावर बुधवारी (१८ आॅक्टोबर) राज्यातील सुमारे दहा लाख शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.

 Ten lakh farmers will be debt relief today | दहा लाख शेतक-यांची आज होणार कर्जमुक्ती!

दहा लाख शेतक-यांची आज होणार कर्जमुक्ती!

Next

मुंबई : नरक चतुर्दशीच्या मुहुर्तावर बुधवारी (१८ आॅक्टोबर) राज्यातील सुमारे दहा लाख शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. तर दिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतक-यांची यादी करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या पातळीवर सुरू आहे.

निवडक शेतक-यांचा मुंबईत सत्कार
 
कर्जमाफीस पात्र शेतक-यांची आकडेवारी सरकारने जाहीर केलेली नाही. अर्जाचे लेखापरीक्षण करून बँकांनी पोर्टलवर अपलोड केले. त्या आधारे ३ वर्गवारीत केलेल्या याद्यांपैकी ‘ग्रीन’मधील याद्या कर्जमाफीस पात्र आहेत. मुंबईत निवडक शेतक-यांचा मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार केला जाईल.

Web Title:  Ten lakh farmers will be debt relief today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.