मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चर्चगेट येथील भाषणातील दहा मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 03:17 PM2017-10-05T15:17:23+5:302017-10-05T15:52:46+5:30

परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने आज संताप मोर्चा काढला होता.

Ten issues of MNS president Raj Thackeray's speech | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चर्चगेट येथील भाषणातील दहा मुद्दे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चर्चगेट येथील भाषणातील दहा मुद्दे

Next

मुंबई - परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने आज संताप मोर्चा काढला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना काही महत्वाचे मुद्दे मांडले. 

- पुढच्या पाच-सहा महिन्यात मंदी वाढणार असे आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल म्हणतात. म्हणजे लोकांच्या नोक-या जाणार. 

- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना मंत्रिपदावरुन काढलं. 

- बुलेट ट्रेनला विरोध करणारा पहिला माणूस मी, बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे स्वस्त मिळतो.

- मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार पण बुलेट ट्रेनसाठी काढलेलं एक लाख कोटीचं कर्ज संपूर्ण देश फेडत बसणार, हे चालणार नाही. 

- माझ्यासमोर उभ केलेलं गुजरातच्या विकासाच चित्र खोट होतं. 

- विकास वेडा झालाय ही स्लोगन भाजपामधूनच आलीय.

- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत


-  मोदी बोलतात धोरणांवर टीका करण म्हणजे देशाविरोधात बोलण, मला सांगा मोदी म्हणजे देश का ? 

- निवडणूक आयोग, न्यायाधीश आणि संपादकांना मी विनंती करतो त्यांनी सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नये, सरकार दर पाचवर्षांनी बदलत असतात. 


-  लाईट घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच. केबल बंद करुन,  वीज गायब करुन आमचा विरोधाचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.

- हा मोर्चा शांततेत निघाला पण पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही.

Web Title: Ten issues of MNS president Raj Thackeray's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.