साताऱ्यात रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 04:42 PM2019-06-15T16:42:20+5:302019-06-15T16:54:01+5:30

दोन्ही राजेंच्या वादामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. रामराजेंनी केलेल्या टीकेला उदयनराजे यांनी सुद्धा उत्तर दिले आहे.

The symbolic statue of Ramarajana combustion in Satara | साताऱ्यात रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

साताऱ्यात रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Next

सातारा - निरा-देवधरच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. रामराजेंनी उदयनराजेंवर स्वयंघोषित छत्रपती म्हणून टीका केल्यानंतर उदयनराजे भोसले समर्थकांनी दुपारी पोवई नाक्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर रामराजेंनी टीका केल्यानंतर उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहे. राजेप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पोवई नाका येथे रामराजेंच्या पुतळ्याचे दहन केले. फलटण येथे रामराजेंनी घेतलेल्या पत्रकार परिषेदेत उदयनराज यांच्यावर टीका करताना, उदयनराजेंना स्वयंघोषित छत्रपती म्हणून संबोधले होते. तसेच उदयनराजे यांचा चक्रम असे उल्लेख केला होता. त्यांनतर उदयनराजेंचे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, छत्रपतींबाबत सातारा जिल्हाच नव्हे तर राज्यात कोणीही अपशब्द वापरल्यास त्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.



 

दोन्ही राजेंच्या वादामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. रामराजेंनी केलेल्या टीकेला उदयनराजे यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात ठेवली असती, असा टोला उदयनराजेंनी लगावला. लोकांवर अन्याय होत असेल तर डोकं फिरतं, लोकांचे कामाचे विषय मार्गी लावायचे असतील तर मी चक्रम होतो. उचलला जीभ आणि लावली टाळ्याला हे आम्ही सहन करणार का? असा प्रश्न उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Web Title: The symbolic statue of Ramarajana combustion in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.