राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:55 AM2019-02-16T01:55:34+5:302019-02-16T01:55:47+5:30

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूने १७ बळी गेले आहेत. तर पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या कालावधीत ३ लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले.

 Swine flu to 17 victims in one and a half month Health Information | राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्र्यांची माहिती

googlenewsNext

मुंबई : गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूने १७ बळी गेले आहेत. तर पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या कालावधीत ३ लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले. त्यापैकी ४ हजार रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. तसेच, स्वाइन फ्लूच्या १४५ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यावर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
स्वाइन फ्लू संदर्भात प्रभावीपणे जनजागृती होण्याकरिता विविध माध्यमांचा वापर करतानाच विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेय स्तरावर जनजागृती मोहीम घेणे, आदी सर्वंकष कृती योजना फेब्रुवारी महिन्यात अंमलात आणण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागासह महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी मंत्रालयातील बैठकीत ते बोलत होते.
स्वाइन फ्लूसंदर्भात प्रबोधनात्मक संदेश तयार करून स्वाइन फ्लू कसा पसरतो, त्याची लक्षणे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी आदी माहिती सर्वसामान्यांना द्यावी. त्याचबरोबर सर्व माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी नर्सेस, आरोग्यसेवक यांची मदत घेऊन मार्गदर्शन करावे, आदी निर्देश या वेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले.

गोळ्यांचा पुरेसा साठा
स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात असून प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. स्वाइन फ्लूवरील प्रतिबंधात्मक असलेल्या टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title:  Swine flu to 17 victims in one and a half month Health Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.