निलंबित पोलिसाने पळविली ६० काडतुसे, वरिष्ठांकडून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:37 AM2017-12-11T05:37:53+5:302017-12-11T05:38:05+5:30

पोलिसांकडून संरक्षणार्थ वापरली जाणारी जिवंत काडतुसे (बुलेट्स) चोरीला जाण्याची घटना वरळी पोलीस मुख्यालयातील सशस्त्र दलात (एलए-३) शनिवारी रात्री घडली. एका निलंबित पोलिसाने हे कृत्य केल्याने मुख्यालयात गोंधळ उडाला होता.

 Suspended police escaped 60 cartridges and senior officials tried to hide the case | निलंबित पोलिसाने पळविली ६० काडतुसे, वरिष्ठांकडून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न

निलंबित पोलिसाने पळविली ६० काडतुसे, वरिष्ठांकडून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न

Next

जमीर काझी/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलिसांकडून संरक्षणार्थ वापरली जाणारी जिवंत काडतुसे (बुलेट्स) चोरीला जाण्याची घटना वरळी पोलीस मुख्यालयातील सशस्त्र दलात (एलए-३) शनिवारी रात्री घडली. एका निलंबित पोलिसाने हे कृत्य केल्याने मुख्यालयात गोंधळ उडाला होता. मात्र श्वान पथकाच्या मदतीने अवघ्या तासाभरात काडतुसांचा माग काढण्यात आला.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा गवगवा होऊ नये, यासाठी हे प्रकरण गोपनीय ठेवण्यात येत आहे. तथापि, वायरलेसवरून त्याबाबतचे ‘मेसेज’ गेल्याने त्याची पोलीस दलात चर्चा सुरू होती. वरिष्ठ अधिकाºयांनी त्याबाबत मौन बाळगले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलाच्या चार सशस्त्र विभागांपैकी (एलए) वरळी येथे एलए-३ विभाग आहे. तेथे स्टोअर रूममध्ये पोलिसांच्या बंदोबस्ताची साधने, हत्यारे ठेवली जातात. शनिवारी रात्री एक निलंबित असलेला हवालदार तेथे गेला. ड्यूटीवरील पोलिसाबरोबर गप्पा मारताना त्याने ६० जिवंत काडतुसे असलेला पट्टा घेतला. तो पिशवीत घालून तो निघून गेल्यानंतर सुरक्षारक्षकाच्या हा प्रकार लक्षात आला. सशस्त्र दलाच्या प्रमुख अपर आयुक्त अस्वती दोरजे व सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना त्याची कल्पना देण्यात आली.

तक्रार नोंदविण्याचे टाळले
श्वान पथकाने मुख्यालयातील कपाटापासून हवालदारापर्यंत माग काढला. तास-सव्वा तासाच्या शोध मोहिमेनंतर सर्व ६० काडतुसे व्यवस्थित मिळाल्याने याबाबत तक्रार न नोंदविण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाºयांनी घेतला. निलंबित हवालदार व सुरक्षारक्षकाची चौकशी करून कारवाईचे आदेश अधिकाºयांना देण्यात आले आहेत. सहआयुक्त देवेन भारती यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मी काही सांगू शकत नाही
जिवंत काडतुसे हरविल्याची आमच्याकडे काहीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही. तुम्ही काही लिहू नका.
- गजानन बेचूरकर, वरिष्ठ निरीक्षक, वरळी पोलीस ठाणे

घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरळीतील मुख्यालयात धाव घेतली. निलंबित पोलिसाने जिवंत काडतुसे चोरल्याचे लक्षात आल्याने त्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले.
प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने निलंबित हवालदाराने काडतुसाची पिशवी मुख्यालयापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर जुन्या पेट्रोल पंपाजवळील मैदानात ठेवली.
 

Web Title:  Suspended police escaped 60 cartridges and senior officials tried to hide the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.