Suicide due to lover in Dhule, the reason behind suicide is unclear | धुळ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट

धुळे : साक्री तालुक्यातील धाडणे फाट्यावर एका प्रेमीयुगुलाने वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारत मरण पत्करले. आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही.
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गालगत साक्री ते पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्यालगत धाडणे (ता़ साक्री) येथील कैलास बागुल आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दीपाली चव्हाण या प्रेमीयुगुलाने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कैलास एका खासगी पोल्ट्री फार्ममध्ये कामाला होता. त्याची बदली कळवण तालुक्यात झाली होती. तेथेच त्याचे दीपालीशी सूत जुळले. सहा महिन्यांपूर्वी ते दोघे विवाहबद्धही झाले होते, असे कळते.