कर्जमाफी यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची सरण रचून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:12 AM2018-04-17T02:12:06+5:302018-04-17T02:12:06+5:30

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील माधवराव शंकरराव रावते (७५) या शेतक-याने कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने स्वत:च्या शेतात सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेला सोमवारी वाचा फुटली.

Suicide by creating a farmer's suicide, since there is no name in the debt waiver list | कर्जमाफी यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची सरण रचून आत्महत्या

कर्जमाफी यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची सरण रचून आत्महत्या

googlenewsNext

उमरखेड (जि. यवतमाळ) : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील माधवराव शंकरराव रावते (७५) या शेतक-याने कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने स्वत:च्या शेतात सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेला सोमवारी वाचा फुटली.
रावते यांच्याकडे १ हेक्टर, ४६ आर खडकाळ जमीन आहे. कर्जमाफीत नाव नसल्याने ते हताश होते. अशातच शनिवारी दुपारी ते शेतात गेले. स्वत:च सरण रचले. त्याला आग लावून त्यात उडी घेतली. यात त्यांचा मृ्त्यू झाला. बिटरगाव पोलिसांना सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली.

उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील शेतकरी माधव रावते यांनी स्वत:च्या शेतात पºहाटीच्या ढिगाला आग लावून जाळून घेतल्याची माहिती मिळाली. याची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठांना कळविले असून सविस्तर चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे.
- भगवान कांबळे, तहसीलदार, उमरखेड

रस्त्यावर विष घेऊन आत्महत्या
पाथरी (जि. परभणी) : आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकºयाने रस्त्यावर विष घेऊन आत्महत्या केली. शिवाजी बाबासाहेब घांडगे (५५) असे त्याचे नाव आहे़ घांडगे यांनी सोमवारी रात्री घरासमोरील रस्त्यावर येऊन विष घेतले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले़ रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

Web Title: Suicide by creating a farmer's suicide, since there is no name in the debt waiver list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.