सुधाकर शिंदे यांचे निलंबन टाळून बदली; अश्विन मुद्गल नागपूरचे तर सुनील चव्हाण औरंगाबादचे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 06:13 AM2018-04-17T06:13:54+5:302018-04-17T06:13:54+5:30

नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणलेले पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचे निलंबन सरकारने टाळले असले तरी त्यांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.

Sudhakar shinde switches off suspension; Ashvin Mudgal of Nagpur and Sunil Chavan, Collector of Aurangabad | सुधाकर शिंदे यांचे निलंबन टाळून बदली; अश्विन मुद्गल नागपूरचे तर सुनील चव्हाण औरंगाबादचे जिल्हाधिकारी

सुधाकर शिंदे यांचे निलंबन टाळून बदली; अश्विन मुद्गल नागपूरचे तर सुनील चव्हाण औरंगाबादचे जिल्हाधिकारी

Next

मुंबई : नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणलेले पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचे निलंबन सरकारने टाळले असले तरी त्यांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.
राज्यातील २८ आयएएस अधिका-यांची बदली करण्यात आली असून पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांना पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आणण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची बदली परिवहन आयुक्तपदी करण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल हे नागपूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. शिक्षण आयुक्त; पुणे डॉ.विपिन वर्मा हे पुण्यातच मेडाचे महासंचालक म्हणून जात आहेत. त्यांच्या जागी विशाल सोळंकी हे नवे शिक्षण आयुक्त असतील. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी असतील. औरंगाबादचे सध्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असतील.
नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्त माधवी खोडे-चवरे यांची बदली महिला बालकल्याण आयुक्त; पुणे येथे करण्यात आली आहे. खोडे यांच्या जागी ऋषिकेश मोडक नागपुरात जात आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी.आरदड हे अहमदनगर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. सहजिल्हाधिकारी

(जव्हार) पवनीत कौर या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. आतापर्यंत अहमदनगर महापालिकेचे आयुक्त असलेले जी.सी.मंगळे यांची बदली महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.अभय महाजन यांची बदली मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात उपसचिव-प्रकल्प अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभाग; मंत्रालय येथील उपसचिव-प्रकल्प संचालक रुचेश जयवंशी हे आता पुणे येथे अपंग कल्याण आयुक्त असतील. एमएमआरडीएचे सहमहानगरआयुक्त संजय यादव हे अकोला जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर महिला व बालकल्याण आयुक्त; पुणे एल.एस.माळी हे नांदेड-वाघाळा महापालिकेचे आयुक्त म्हणून जात आहेत.
वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आता अहमदनगरचे जिल्हाधिकारी तर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे वाशिमचे नवे जिल्हाधिकारी असतील. आंचल गोयल (सहजिल्हाधिकारी डहाणू) या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नव्या विशेष कार्यकारी अधिकारी असतील.

- नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे मुंबई उपनगरचे तर जालनाचे जिल्हाधिकारी एस.आर. जोंधळे हे मुंबई शहराचे जिल्हाधिकारी असतील.
- मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आता विक्रीकर विभागाचे नवे सहआयुक्त असतील. राज्य कामगार विमा योजना; मुंबईच्या आयुक्तपदी डॉ.ऋषिकेश यशोद यांना नेमण्यात आले आहे.
- मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांना पणन आयुक्तपदी (नवी मुंबई) नेमण्यात आले. खनिकर्म महामंडळ; नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.निरुपमा डांगे या बुलडाण्याच्या नव्या जिल्हाधिकारी असतील.
- अकोला जि.प.चे विशेष कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती यांची बदली डांगे यांच्या जागी खनिकर्म महामंडळात झाली आहे.
- बुलडाण्याचे सध्याचे जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली राज्य रस्ते विकास महामंडळ; मुंबई येथे सहसंचालकपदी करण्यात आली आहे.

Web Title: Sudhakar shinde switches off suspension; Ashvin Mudgal of Nagpur and Sunil Chavan, Collector of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.