महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:21 PM2017-11-14T23:21:58+5:302017-11-14T23:51:37+5:30

Stylish Style of Actress Sai Tamhankar, Revolution Redkar | महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज

महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणा-या  महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी  रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळाला. त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सोहळ्यात चार चॉँद लावले आहेत. यावेळी या सेलिब्रिटींनी अनेकांनी आपल्या स्टाईलबाबत सांगितले. 

ताज लॅण्ड हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीसह राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी आलिया भटला मोस्ट स्टायलिश रायजिंग स्टार हा पुरस्कार देण्यात आला. आलिया भटने स्टेजवर चेतन भगत यांच्यासोबत सेक्सी राधा गाण्यावर डान्सही केला. विशेष म्हणजे आलिया यावेळी मराठीतही बोलली. जेव्हा कधी आपण एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करत असतो असं अभिनेत्री आलिया भटने सांगितलं आहे. 

लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे. 

ट्रॉफीही स्टायलिश
महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही.
 

Web Title: Stylish Style of Actress Sai Tamhankar, Revolution Redkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.