विद्यार्थ्यांची बस उलटली, ५२ पैकी २० मुलांना दुखापत, तर ५ मुले गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:42 AM2017-09-21T00:42:37+5:302017-09-21T00:42:39+5:30

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील कमळीच्या मळ्याजवळ कोरेगाव भीमातील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती ओढ्यात उलटली.

The students were displaced, 20 of 52 children were injured, and 5 were seriously injured | विद्यार्थ्यांची बस उलटली, ५२ पैकी २० मुलांना दुखापत, तर ५ मुले गंभीर जखमी

विद्यार्थ्यांची बस उलटली, ५२ पैकी २० मुलांना दुखापत, तर ५ मुले गंभीर जखमी

Next

कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील कमळीच्या मळ्याजवळ कोरेगाव भीमातील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती ओढ्यात उलटली. या वेळी बसमधील ५२ पैकी २० मुलांना दुखापत झाली, तर ५ मुले गंभीर जखमी आहेत. पाण्यात बुडालेल्या बसमधील मुलांना स्थानिक तरुणांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. शाळा व्यवस्थापनाने गांभीर्य न दाखवल्याने ही दुर्घटना घडल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील अल्-अमीन फाउंडेशनची ग्लोरी इंग्लिश मीडियम शाळा आहे. सकाळी शाळेच्या बसमधून संतोष गाडेकर हे चालक मुलांना शाळेत आणण्यासाठी कमळीच्या मळ्याजवळ आले. बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याचे गाडेकर यांच्या लक्षात आले.

Web Title: The students were displaced, 20 of 52 children were injured, and 5 were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.