पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन हाणून पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, धनंजय मुंडेंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 03:51 PM2018-07-30T15:51:18+5:302018-07-30T15:53:17+5:30

आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने गुजरातमध्ये सुरू केलेले आंदोलन ज्याप्रकारे हाणून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे आता राज्यात पेटलेले मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी...

State government's attempt to thwart Maratha agitation like Patel agitation, Dhananjay Mundane's allegations | पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन हाणून पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, धनंजय मुंडेंचा आरोप 

पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन हाणून पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, धनंजय मुंडेंचा आरोप 

googlenewsNext

मुंबई -  आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने गुजरातमध्ये सुरू केलेले आंदोलन ज्याप्रकारे हाणून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे आता राज्यात पेटलेले मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी केला.  





मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी बैठक बोलावली होती. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला  अजित पवार, छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले, "आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने गुजरातमध्ये सुरू केलेले आंदोलन ज्याप्रकारे हाणून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे आता राज्यात पेटलेले मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाज चर्चेला तयार नाही. मात्र समाजातील काही घटकांना घेऊन चर्चा करायची आणि चळवळीत फूट पाडायची ही सरकारची रणनीती शेतकरी आंदोलनाच्या वेळीही दिसून आली होती."  

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागासवर्गीय आयोगाला निवेदन देण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी . गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण , दिलीप सोपल, नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 आमदार उपस्थित होते.  





धनंजय मुंडे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
- सकल मराठा समाजाचे मागणी ते आरक्षण त्वरित मिळावे म्हणून राष्ट्रवादी नेते मागासवर्गीय आयोगाकडे निवेदन देणार
- हे आरक्षण लवकर मिळाले पाहिजे. 
- त्याबरोबर नोकरभरतील 16 % जागा राखीव ठेवल्या पाहिजे
- मुख्यमंत्री म्हणाले गुन्हे मागे घेऊ पण पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन थांबले नाही 
- 18 तारखेला मी सभागृहात बोललो होतो आता ठोक मोर्चे निघत आहे 
- सरकार बघ्याची भूमिका घेत आहे 
- गुजरात मध्ये पटेलांचे आंदोलन हाणून पाडलं,त्याच पद्धतीने सरकरच्या वतीने प्रयत्न करत आहे  

Web Title: State government's attempt to thwart Maratha agitation like Patel agitation, Dhananjay Mundane's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.