एसटी कर्मचाऱ्यांना आता बालसंगोपन रजा मिळणार, दिवाकर रावतेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 03:10 AM2018-12-31T03:10:16+5:302018-12-31T03:10:32+5:30

एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

ST employees will now get childhood leave, Divakar Rawate's announcement | एसटी कर्मचाऱ्यांना आता बालसंगोपन रजा मिळणार, दिवाकर रावतेंची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांना आता बालसंगोपन रजा मिळणार, दिवाकर रावतेंची घोषणा

Next

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच
ज्या कर्मचा-यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचा-यांना ही रजा मिळू शकेल.
एसटी महामंडळाने महिला कर्मचा-यांना प्रसूती काळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या निर्णयाचा पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचा-यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करताना कुटुंबाकडे लक्ष देणे अवघड बनते. विशेषत: मुलांच्या परीक्षेच्या काळात सुट्यांची आवश्यकता भासते. त्यामुळे राज्य सरकारच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचा-यांना सहा महिने म्हणजेच १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणावर महिलांची भरती केली आहे. वाहक पदासह विविध पदांवर महामंडळात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आहेत. यात ग्रामीण भागातील मुलींची संख्या मोठी असून महामंडळाच्या नोकरीमुळे महिला कर्मचाºयांच्या कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत असल्याचेही रावते म्हणाले.

असे आहेत रजेचे निकष
- बालसंगोपन रजेसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांना लागू असलेल्या अटी- शर्ती महामंडळातील कर्मचा-यांनाही लागू असतील.
- मुलांचे वय १८ वर्षे होईपर्यंत ही रजा घेता येईल. पहिल्या दोन मुलांसाठी ही रजा घेता येणार असून एका वर्षात जास्तीत जास्त दोन महिन्यांची रजा घेण्याची मुभा आहे.

Web Title: ST employees will now get childhood leave, Divakar Rawate's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.