सोलापूर : ना ओळख ना पाळख़, ना नातेगोते, पण एका अवघडलेल्या महिलेची प्रसूती करण्यासाठी इतर महिला धावल्या आणि त्या सुखरूप प्रसूती झाली़ माणुसकीचा हा पाझर सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी पाहायला मिळाला़
कविता विनोद राठोड (२५, रा़ दुधनी, ता़ अक्कलकोट) ही गर्भवती पुण्याहून अक्कलकोट तालुक्यातील दुधनीगावाजळील बळोरगी तांड्याकडे जाण्यासाठी सोलापूरच्या बसस्थानकावरील फलाट क्रमांक १४ वर उभी होती. तिच्यासोबत दोन लहान मुलेही होती. या वेळी अचानक तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. सुरक्षारक्षक लक्ष्मण जाधव यांनी बसस्थानक परिसरात किरकोळ विक्रेत्या करणाºया महिलांना बोलाविले़ त्यांनी ताबडतोब साड्या मागवून तिला आडोसा केला़ या वेळी लातूरकडे जाणाºया प्रवासी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी त्यांना मदत केली आणि भर स्थानकावरच कविताने एका मुलाला जन्म दिला़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.