शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची विमानातून सहल; शाळेचा अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 12:24 PM2018-02-20T12:24:06+5:302018-02-20T12:24:38+5:30

सर्वसामान्यपणे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खासगी किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून किंवा रेल्वेतून जाते, पण एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींची सहल विमानातून निघणार आहे.

Solapur Farmer family students trip by the plane; School Innovation | शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची विमानातून सहल; शाळेचा अभिनव उपक्रम

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची विमानातून सहल; शाळेचा अभिनव उपक्रम

Next

पुणे : सर्वसामान्यपणे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खासगी किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून किंवा रेल्वेतून जाते. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींची सहल विमानातून निघणार आहे. सोमवारी या विद्यार्थ्यांनी पुण्यातील प्रेक्षणिय स्थळ पाहण्याच्या आनंद लुटला. रविवारी पहाटे त्यांचा विमान प्रवास सुरू होईल.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बद्रुुक येथील जिल्हा परिषदेच्या कन्नड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल बंगलोर येथे विमानाने जाणार आहे. लोहगाव विमानतळावरून पहाटे ५.५५ वाजता पुण्यातून बंगलोर असा विमान प्रवास करून सहलीचा आनंद लुटणार आहेत. सोमवारी मुलांनी शनिवारवाडा, लालमहल पाहून श्रीमंत दगडूशेठ गणपतींचे दर्शन घेतले. शनिवारवाडा पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी व शाळेच्या मुख्याध्यापकांनी पत्रकारांशी संवाद साधला. लहान मुलांना विमानाची प्रवास अनुभवता यावा, या उद्देशाने ही सहल आयोजित केली असल्याचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी सांगितले.सहलीत इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंत एकूण ३५ विद्यार्थ्यांना सहभाग आहे. त्यात १० मुली, २५ मुलांचा समावेश आहे. दुपारी पुण्यात दाखल झालेले मुले रात्री मुंजाबा वस्ती येथील मोझे विद्यालयात मुक्कामी असून पहाटे पुण्यातून रवाना होतील.

कट्टीमनी म्हणाले, विमानाचे तिकीट दोन महिन्यांपूर्वीच घेतल्याने ते कमी रक्कमेत मिळाले. काही मुलांना सर्व खर्च करणे शक्य नसल्याने त्यांचा खर्च आम्ही उचलला आहे. तसेच मुलांना आकाशात दिसणा-या विमानाबाबत कुतूहल असते. मात्र, लहान वयातच त्यांना सफर घडावी, या हेतूने ही सहल आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाºयांनी व स्थानिक शिक्षण अधिका-यांनी सहलीसाठी परवानगी दिली आहे.

Web Title: Solapur Farmer family students trip by the plane; School Innovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.