पुढील आर्थिक वर्षी वीज दरवाढीचा शॉक : एप्रिलपासून ३ टक्के दरवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:00 PM2019-03-30T23:00:00+5:302019-03-30T23:00:02+5:30

केवळ यावर्षीच नव्हे तर, पुढील आर्थिक वर्षांत (२०१९-२०) देखील ग्राहकांना वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

shock of Electricity rate increasing in the next financial year : 3 percent since April | पुढील आर्थिक वर्षी वीज दरवाढीचा शॉक : एप्रिलपासून ३ टक्के दरवाढ 

पुढील आर्थिक वर्षी वीज दरवाढीचा शॉक : एप्रिलपासून ३ टक्के दरवाढ 

Next
ठळक मुद्देपुढच्या आर्थिक वर्षांत सव्वाबारा हजार कोटींची वाढयंदाच्या आर्थिक वर्षात मात्र, ३ टक्के दराने बिलात वाढ होणार

पुणे : केवळ यावर्षीच नव्हे तर, पुढील आर्थिक वर्षांत (२०१९-२०) देखील ग्राहकांना वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नियामक मत्ता अंतर्गत सव्वाबारा हजार कोटी रुपयांच्या वीजदरवाढीला परवानगी दिली आहे. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मात्र, ३ टक्के दराने बिलात वाढ होईल. 
महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या मध्यावधी फेरयाचिकेवर १२ सप्टेंबर २०१८ रोजी आदेश दिला. त्यानुसार १ एप्रिल २०१९पासून ३ टक्के दराने वीज बिलात वाढ होणार आहे. बहुवर्षीय वीज दर विनियम २०१५ नुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३ नोव्हेंबर २०१६ रोजी आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंतच्या वीजदराचा आदेश दिला होता. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१८-१९ व १९-२० साठी वीजदरात सुधारणा करण्यात आली. त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०१८ पासून करण्यात आली. पुढील टप्प्यात आर्थिक वर्ष २०१९-२० साठी येत्या १ एप्रिल पासून सुधारीत दर लागू होत आहेत. 
आर्थिक वर्ष २०१९-२० साठी पाचशे युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात आर्थिक वर्ष २०१८-१९च्या तुलनेत सरासरी केवळ तीन एवढीच वाढ झालेली आहे. घरगुती ग्राहकांच्या स्थिर आकारात १० रुपये प्रति महिना एवढीच वाढ असून सरासरी, वीजदरात १७ ते ३१ पैसे प्रति युनिट म्हणजेच केवळ तीन टक्के दरवाढ होत असल्याचे सांगण्यात आले. 
----------------
अशी करण्यात आली वीज दरवाढ 

 आयोगाने ८ हजार २६८ कोटी रुपयांची वाढ आर्थिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० या वर्षांसाठी मंजूर केली. आर्थिक वर्ष २०१८-१९साठी ६.६३ रुपये प्रति युनिट इतका सरासरी वीजदर मंजूर केला आहे. तर आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ६.८५ रुपये प्रति युनिट इतका सरासरी वीजदर मंजूर केला आहे. या शिवाय आयोगाने या वीजदर आदेशात १२,३८२ कोटी रुपयांचा ह्यनियामक मत्ताह्ण आकारण्यास मंजुरी दिली आहे. त्याची वसुली २०२०-२१ या आर्थिक वषार्पासून केली जाणार आहे. 
----------------------
लघुदाब ग्राहक    २०१८-१९    २०१९-१०     प्रतियुनिट दरवाढ पैशांमध्ये 
०-१०० युनिट    ५.३१        ५.४८           १७ 
१०१-३००    ८.९५        ९.२६           ३१
३०१-५००     ११.५७        ११.७५           १८

Web Title: shock of Electricity rate increasing in the next financial year : 3 percent since April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.