शिवाजी महाराजांचे पुतळे शोभेसाठी नाहीत, प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:53 PM2019-01-12T15:53:50+5:302019-01-12T15:59:39+5:30

शिवाजी महाराज यांचे पुतळे हे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी उभारले जातात, त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो असे  गौरव उदगार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते.

Shivaji Maharaj statues are not for decoration but for inspiration: Sharad Pawar |  शिवाजी महाराजांचे पुतळे शोभेसाठी नाहीत, प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवार

 शिवाजी महाराजांचे पुतळे शोभेसाठी नाहीत, प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवार

googlenewsNext
ठळक मुद्दे शिवाजी महाराज यांचे पुतळे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवारबेळगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

बेळगाव  : शिवाजी महाराज यांचे पुतळे हे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी उभारले जातात, त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो असे  गौरव उदगार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार अंजली निंबाळकर, श्रीमंत पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, चंदगडच्या आमदार संध्याताई कुपेकर आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, की देशात अनेक राज्य होऊन गेले, पण रयतेच राज्य हे फक्त शिवाजी महाराज यांचेच होते. ते स्त्रियांचा आदर करत होते, म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. शिवाजी महाराजांचे पुतळे दिल्लीत संसद भवन, गुजरात, आग्रा अश्या देशातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. शिवछत्रपती हे पहिले  राजा ज्यानी  समुद्राचे महत्व ओळखल होत, असेही ते म्हणाले.


दुपारी साडे बारा वाजता पवार तर दोन  वाजता सिद्धरामय्या यांचे सभा स्थळी आगमन झाले होते. शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे फक्त प्रतीक नाहीत तर ते संपूर्ण देशाचे स्वाभिमान आहेत असे सिद्धरामय्या यांनी म्हटलं.

शिवाजी महाराज हे महापुरुष कोणा एका जातीचे आणि धर्माचे नाहीत ते संपूर्ण भारताचे प्रेरणा स्थान आहेत शिवाजी महाराज हे कधी धर्मा धर्मामध्ये संघर्ष व्हावे यासाठी लढले नाहीत पण आज धर्मा-धर्मामध्ये लढवल जात आहे हे दुर्दैव आहे अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Shivaji Maharaj statues are not for decoration but for inspiration: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.