नाशिक : गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकुन नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणा-या शिवसेनेने दहा दिवसांतच पलटी मारली आहे. गुजरातमधील मराठीभाषिक ४० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
गुजरातची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी यांना अपशकुन नको म्हणून शिवसेना निवडणूक लढविणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी नाशकात ३० नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. या वेळी त्यांनी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुतीही केली होती. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेचे भाजपाने स्वागत केले तर विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता पलटी मारत घेतलेल्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी यांना अपशकुन करण्यासाठी शिवसेना सरसावल्याचे बोलले जात आहे. सेनेची ही उडी म्हणजे हिंदू मतांचे विभाजन मानले जात असून भाजपापुढची डोकेदुखी यामुळे वाढणार आहे.सध्या भाजपा व शिवसेनेमध्ये सतत वाद होत आहेत़ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत़ त्यामुळे आता गुजरात निवडणूक याचे काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

गुजरातची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी यांना अपशकुन नको म्हणून शिवसेना निवडणूक लढविणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी आधी जाहीर केले होते़ त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची स्तुतीही केली होती़ मात्र आता शिवसेनेने घुमजाव केले़