ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 4 - गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात डुकरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेकदा वाहनांच्या मध्येच डुकरे आडवी येत असल्यानं वाहतुकीची कोंडीही होत आहे. तसेच अनेक नागरिकांना डुक्कर चावल्याचा घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीने डुक्कर विरोधी आंदोलन करण्यात आलं आहे.

शिवसेनेने महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या टेबलावर डुकराचं पिल्लू बसवून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र शिवसेनेच्या या डुक्करविरोधी आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.