नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...; 'रामदासभाईं'नी सांगितला अंगाशी आलेला खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 02:19 PM2019-01-01T14:19:11+5:302019-01-01T14:22:51+5:30

नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

Shiv Sena had to make a 'game' of BJP in Nagar, but ... | नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...; 'रामदासभाईं'नी सांगितला अंगाशी आलेला खेळ

नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...; 'रामदासभाईं'नी सांगितला अंगाशी आलेला खेळ

googlenewsNext
ठळक मुद्देअहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने दिलेला धोबीपछाड शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

मुंबई - अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने दिलेला धोबीपछाड शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे भाजपाला डावलून काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत अहमदनगरची सत्ता मिळवण्याचा डाव शिवसेनेवरच उलटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

  त्रिशंकू निकाल लागलेल्या अहमदनगर महानगपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र निकालांमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भाजपाने  कुरघोडीच्या राजकारणात आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आपले महापौर आणि उपमहापौर नगरच्या महानगरपालिकेत बसवले होते. दरम्यान, अहमदनगरमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया देताना रामदास कदम म्हणाले की, ''अहमदनगरमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.''  

दरम्यान, दरम्यान, नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याची आतली गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर सांगितली होती. नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंब्यापाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. स्थानिक पातळीवर बोलणी सुरू होती.  मीसुद्धा सेनेकडूना ची मागणी झाल्यास पाठिंबा द्या, असे सुचवले.  मात्र महापौर निवडीच्या तीन दिवस आधीपर्यंत शिवसेनेतून कुणीही आमच्याशी बोलण्यास तयार नव्हते. मात्र पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही. उलट आम्हीच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी बोलावे. रामदास कदमांना आम्ही पाठिंबा देतोय म्हणून सांगा, अशी गळ घालण्यात आली. मात्र पाठिंब्यासाठी शिवसेनेने  प्रस्ताव दिला पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले. अखेरपर्यंत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार होतो. अखेरीस शेवटच्या दिवशी महापौर निवडीसंदर्भातील सर्वाधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला दिले, असे फडणवीस म्हणाले होते.  

Web Title: Shiv Sena had to make a 'game' of BJP in Nagar, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.