...आणि अखेर भाजपा-शिवसेना युती झालीच; अमित शहा, उद्धव ठाकरेंच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 07:55 PM2019-02-18T19:55:30+5:302019-02-18T23:16:17+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपाचमध्ये युतीची चर्चा सुरू होती

shiv sena bjp announces alliance ahead of lok sabha election 2019 | ...आणि अखेर भाजपा-शिवसेना युती झालीच; अमित शहा, उद्धव ठाकरेंच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांची घोषणा

...आणि अखेर भाजपा-शिवसेना युती झालीच; अमित शहा, उद्धव ठाकरेंच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next

मुंबई: गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. युतीच्या अंतिम चर्चेसाठी मित्रपक्षाला पटक देंगे म्हणणारे भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मातोश्रीवर आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेन-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा भाजपा लढवणार आहे. तर शिवसेना 23जागा लढवेल. तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवतील.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी सोफिटेल हॉटेलमध्ये अमित शहांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह चर्चा केली. त्यानंतर ही नेते मंडळी युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचली. याआधी उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. युती झाल्यानंतर नेमकी रणनिती काय असणार, जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, याबद्दल या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेनं सातत्यानं मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय स्वबळाचा नारादेखील उद्धव यांनी दिला होता, त्यामुळे आता शिवसेना मतदारांना कशी सामोरी जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपानं युती करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटप निश्चित झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं लगेच युतीचा मुद्दा निकाली काढला. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास नुकसान होत असल्याचा अंदाज अनेक सर्वेक्षणांमधून समोर आला होता. त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

Web Title: shiv sena bjp announces alliance ahead of lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.