Shetti should be forced to work rather than forcing the workers - Khot | कार्यकर्त्यांना पुढे करण्यापेक्षा शेट्टींनी अंगावर यावे - खोत

कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खा. राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निवेदनाद्वारे दिले.
माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माढा (जि. सोलापूर) येथे शनिवारी खोत यांच्या गाडीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.
खोत म्हणाले, ‘‘राजू शेट्टी यांची लढाई आता सरकारसोबत नव्हे तर सदाभाऊंबरोबर आहे. त्यांनी शेतकरी चळवळ आत्मकेंद्रित केली आहे. आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झालेला त्यांना कधीच सहन झालेले नाही.’’


Web Title:  Shetti should be forced to work rather than forcing the workers - Khot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.