‘ती’ सांगीतिक जबाबदारी नव्हे तर आव्हान : भुवनेश कोमकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 07:00 AM2019-05-12T07:00:00+5:302019-05-12T07:00:05+5:30

भुवनेश कोमकली या प्रतिभावंत कलाकाराचं नाव उच्चारलं की पं. कुमार गंधर्व यांचा सांगीतिक वारसा डोळ्यासमोर येतो.

'She' is not the responsibility of the music but the challenge: Bhuvanesh Komkali | ‘ती’ सांगीतिक जबाबदारी नव्हे तर आव्हान : भुवनेश कोमकली

‘ती’ सांगीतिक जबाबदारी नव्हे तर आव्हान : भुवनेश कोमकली

Next

भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात पंडितजींसह वसुंधरा कोमकली, मुकुल शिवपुत्र यांनी अद्वितीय गायकीतून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.  मात्र, त्यांचे अनुकरण न करता त्यांच्या सांगीतिक मूल्यांची जपणूक करीत भुवनेश कोमकली यांनी संगीत विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. रविवारी ( 12 मे) त्यांच्या प्रभातकालीन मैफलीची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. त्यानिमित्त भुवनेश कोमकली यांच्याशी  ‘लोकमत’ने  साधलेला हा संवाद.
 

नम्रता फडणीस
* आजोबा पं. कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, वडील मुकुल शिवपुत्र यांच्या  सांगीतिक कुटुंबात तुमचा जन्म झाला. प्रत्येकाच्या गायकीचे स्वतंत्र वैशिष्ट्य असताना स्वत:ची वेगळी ओळख किंवा गायन शैली निर्माण करण्यात कसं यश मिळवलतं?
-  आपली स्वत:ची शैली निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नाही.आपली शैली निर्माण करण्यासाठी दीर्घकाळ साधना आणि मेहनत लागते.ती साधना किती कालांतर करावी लागते याची काही शाश्वती नसते. ते केल्यानंतर स्वत:ची शैली निर्माण होईलच याची खात्रीही देता येत नाही. ज्यांच्याकडून मी शिकलो ज्यांचा वारसा मला लाभला, त्यांनी जो अप्रतिम संगीत विचार दिला आहे त्यावर शक्तीनं अभ्यास करून पुढे न्यायचा विचार करतो. त्यांनी संगीताला घेऊन काय विचार केलायं तो पुढं आला पाहिजे. ते करताना जे काही सादर करेन त्याच्यामध्ये माझ्या वैयक्तिक क्षमतेचा हात असतो. माझी वैयक्तिक कुमारजींसारखी असूचं शकत नाही. जे काही नाविन्यं वाटतं ते माझ्या क्षमतेचं आहे. 
* एवढ्या मोठ्या कुटुंबाचा वारसा लाभल्यामुळे आपल्यावर एक  सांगीतिक जबाबदारी आहे असं वाटतं का? त्याचं दडपण कधी जाणवत का? 
_ - मी याला जबाबदारी म्हणणारं नाही तर एक आव्हान आहे असं म्हणेन. कारण त्यांच्या विचारांना आत्मसात करणं कठीण आहे. त्यांनी जे करून ठेवलयं त्याचा अभ्यास करून बरोबर तसं करून दाखवणं अवघड आहे. त्यांना ते सहज शक्य होतं कारण एकेका संगीताच्या पैलूंवर त्यांचं प्रभुत्व होतं. आपलं प्रत्येक अंगांवर प्रभुत्व असतचं असं नाही. जसं प्रभुत्व होत जातं तसं आपणं वाढत जातो. ते खूप मोठं आव्हान आहे जे करीत राहावं असं आहे. 
* आजचं संगीत एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त झालयं किंवा कलाकारांवर सादरीकरणाबाबत मर्यादा आल्यात असं वाटतयं का?
- ही गोष्ट दोन्ही बाजूंनी असते. ऐकणारे असतील तर गाणारा गातो आणि गाणारा असेल तर ऐकणारे ऐकतील. कलाकाराला वेळेची मर्यादा आली आहे ते नियम पाळले पाहिजेत.  ते नियम पाळून पण रात्रभर गाणं गाऊ शकतो. खरोखर रात्रभर गाणं ऐकायचं असेल तर ते छोट्या मैफलीमधून ऐकू शकतो ना? ज्यांना करायचं ते करतात गायचं ते गातात. रसिकांनाही आता ऐकायला वेळ नसतो. दोन्ही बाजू जवाबदार असतात. 
* प्रात:कालीन मैफली आता दुर्मीळ झाल्या आहेत. रसिक आज त्याला जवळपास मुकले आहेत. या मैफली पुन्हा सुरू व्हायला हव्यात असं वाटतं का?
-सकाळच्या मैफली कमी झाल्या आहेत हे खरं आहे. माझ्यासारख्या अनेक कलाकारांना संधी मिळाली तरी नक्कीच गायला आवडेल. पूर्वी सकाळच्या मैफली व्हायच्या त्या खंड पडलाय पण त्या प्रयत्न केल्यास पुन्हा सुरू होतील. सकाळ कशाला दुपारच्या मैफलीचा पण विचार व्हायला हवा. 
* संगीतात तंत्रज्ञान शिरले आहे, ते संगीतावर हावी होतयं का? याविषयी काय सांगाल?
- तंत्रज्ञानाचा फायदा हा संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी झालेला आहे. युवा पिढी खूप टेक्नॉसँव्ही आहे. मात्र प्रश्न रियाजाचा असेल तर रियाजाशिवाय पर्याय नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे जाओ स्कायपर शिका किंवा समोर बसून शिका. रियाज हा करावाच लागेल.संगीताच्या क्षेत्रात कुठली गोष्ट इन्स्टंट कॉपीसारखी नाहीये. त्यामुळे युवापिढीने रियाज करावा आणि गुरूप्रती श्रद्धा ठेवावी. 
------------------------------------------------------------

Web Title: 'She' is not the responsibility of the music but the challenge: Bhuvanesh Komkali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.