Sharad Pawar gave me the post of NCP State President - Jayant Patil | शरद पवारांमुळेच मला राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं- जयंत पाटील
शरद पवारांमुळेच मला राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं- जयंत पाटील

नागपूर- लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यातील लोकमत की अदालतमध्ये मान्यवरांना सामान्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यात आले आहेत. अॅड. उज्ज्वल निकम यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद ताईंमुळे मिळालं की दादांमुळे, असा प्रश्न विचारला. त्याला जयंत पाटलांनीही आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

दादा किंवा ताईंमुळे नव्हे, तर शरद पवारांमुळे मला राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. सरपंच पदापासून संसदेपर्यंत उत्तम कामगिरी करणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याची प्रथा ‘लोकमत’ने सुरू केली आहे. या मालिकेतील विधिमंडळ पुरस्काराचे हे दुसरे पुष्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आमदारांचा सन्मान केला जाणार आहे.

सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.


Web Title: Sharad Pawar gave me the post of NCP State President - Jayant Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.