मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगलेली असतानाच रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सह्याद्री अतिथीगृहात दोन्ही नेत्यांनी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. त्याचा अधिकृत तपशील समजलेला नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत. राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशास शिवसेनेचा विरोध आहे. राणे यांच्या समावेशाबाबत बोलताना ‘आठ दिवस थांबा, ईश्वरी संकेत वेगळे आहेत,’ असे सूचक वक्तव्य गृह राज्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचेही बोलले जाते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.