नरेंद्र गुरव 
नंदुरबार : बोराळे येथील जवान मिलिंद किशोर खैरनार हे काश्मिरात शहीद झाल्याची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. मिलिंद यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील किशोर खैरनार हे चंदीगडला गेले पण ते काश्मिरात होते. त्यामुळे दोन महिने थांबूनही त्यांची भेट होऊ शकली नाही. मंगळवारीच ते नाशिक येथे परतले आणि बुधवारी सकाळी मुलगा शहीद झाल्याचे त्यांना समजली.
बोराळे येथे मिलिंद यांचे वडिलोपार्जीत घर आहे. त्यांचे काका, काकू येथे राहतात. बुधवारी सरपंच पुनमचंद पटेल, उपसरपंच यशवंत भिल यांच्यासह गावातील मंडळी त्यांच्या घरी गेली होती. तेथे दाखल झाली. तहसीलदार नितीन पाटील यांनी गावात भेट देवून अंत्यसंस्कार करण्यात येणाºया तापी काठावरील जागेची पाहणी केली. मिलिंद यांचे पार्थिव सकाळी ११.३० वाजेपर्यंत नाशिक येथे आणण्यात येईल. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय-
बुधवारी गावातील चुली पेटल्या नाहीत. यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.