दाऊदचे मोदी सरकारशी सेटलमेंट, फेसबुक पेजचे अनावरण, तरुणाईशी सोशल मीडियावरून संपर्क ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:23 AM2017-09-22T05:23:09+5:302017-09-22T05:23:11+5:30

नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्या कार्यकाळात कसलाही बदल झाला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केला.

Settlement of Dawood's Modi government, unveiling Facebook page, youth contact with social media | दाऊदचे मोदी सरकारशी सेटलमेंट, फेसबुक पेजचे अनावरण, तरुणाईशी सोशल मीडियावरून संपर्क ठेवणार

दाऊदचे मोदी सरकारशी सेटलमेंट, फेसबुक पेजचे अनावरण, तरुणाईशी सोशल मीडियावरून संपर्क ठेवणार

Next

मुंबई : नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्या कार्यकाळात कसलाही बदल झाला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी
केला.
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजचे अनावरण झाले. याप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपा काय करणार आहे, त्यांची रणनीती काय असणार आहे याची माहिती माझ्यापर्यंत पोहचली आहे. ज्या चारपाच योजना आखल्या जात आहेत; त्यापैकी एक दाऊदला भारतात आणण्याचे नाटक आहे. दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन त्याला मरायचे आहे. सध्या त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे. त्याला भारतात आणल्याचे श्रेय घेण्यासाठी हा
प्रकार असल्याचा आरोप राज यांनी केला. मोठ्या विश्वासाने लोकांनी नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली. सोशल मीडियातील भक्तांनी जसा मोदींवर विश्वास ठेवला तसा मी पण ठेवला. पण, साडेतीन वर्षात इव्हेंट आणि भाषणांच्या पलीकडे काहीही झालेले नाही. सोशल मीडीयामुळे आता काहीही लपून राहत नाही.
मोदींच्या ट्विटर अकाऊंटमधील ४८ टक्के तर राहुल गांधींच्या अकाऊटंमधील ५४ टक्के फॉलोअर्स फेक आहेत. पण, माझ्या फेसबुक पेजवर फक्त खरी माहितीच टाकली जाईल, असा चिमटा त्यांनी
काढला.
शेतकरी आत्महत्यांसारखे महत्वाचे विषय सोडून बुलेट ट्रेनची योजना आखली जात आहे. मुंबई मेट्रोच्या लगत गुजराती मतदारसंघ तयार करण्याचा घाट घातला जातोय. मेट्रोच्या नावाखाली बिल्डींग्स पाडायच्या, महागडी घरं बांधायची, ती मराठी माणसाला परवडणार नाहीत आणि हळूहळू आपले मतदार संघ निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप राज यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर सततच्या पराभवांमुळे राज ठाकरे यांचा लोकांशी संपर्क तुटल्याचे बोलले जात होते. आता त्यावर उतारा म्हणून त्यांनी फेसबुक पेजचा आधार घेतल्याची चर्चा आहे.
>राज ठाकरेंचा राणे यांना टोला
मध्यंतरी भाजपाने फुटबॉल वाटले. फुटबॉल वाटले भाजपाने आणि सिंधुदुर्गात लाथ मारली काँग्रेसने! आता दोन्हीकडचे गोली म्हणतात माझ्याकडे नको, अशा शब्दांत राज यांनी नारायण राणे यांची फिरकी घेतली.

Web Title: Settlement of Dawood's Modi government, unveiling Facebook page, youth contact with social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.