सेवा क्षेत्राने केली उत्पादन-कृषीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 03:50 AM2018-03-09T03:50:35+5:302018-03-09T03:50:35+5:30

उत्पादन क्षेत्रापेक्षा तुलनेने कमी रोजगार असलेल्या सेवा क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र देशापेक्षाही जलद वेगाने वाढत आहे. या वेगाने उत्पादन व कृषी क्षेत्रावरही मात केल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आले आहे.

The service sector has grown production-agriculture overcomes | सेवा क्षेत्राने केली उत्पादन-कृषीवर मात

सेवा क्षेत्राने केली उत्पादन-कृषीवर मात

Next

मुंबई - उत्पादन क्षेत्रापेक्षा तुलनेने कमी रोजगार असलेल्या सेवा क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र देशापेक्षाही जलद वेगाने वाढत आहे. या वेगाने उत्पादन व कृषी क्षेत्रावरही मात केल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आले आहे.
कुठल्याही उद्योगातील सर्वाधिक रोेजगार हा उत्पादन क्षेत्रात असतो. उत्पादन क्षेत्र हे कमी शिक्षितांनाही रोजगार देत असल्यानेच ते सर्वसमावेशक मानले जाते. त्या तुलनेत सेवा क्षेत्रातील रोजगार हा सहसा शिक्षित व त्यामुळेच मर्यादित असतो. अशावेळी महाराष्टÑ मात्र सेवा क्षेत्रात देशाच्याही पुढे राहिला आहे.
राज्याच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचा वाटा हा ५४.५ टक्के आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा राज्याच्या जीडीपीतील वाटा फक्त ११.९ टक्के आहे. हेच प्रमाण देश पातळीवर १७.९ टक्के आहे. केवळ उत्पादन क्षेत्रात महाराष्टÑाची कामगिरी देशापेक्षा थोडी चांगली असल्याचे दिसून येते.

उत्पादनातील वाढ कायम : सीआयआय
येत्या काळात सेवा क्षेत्रच वेगाने बहरेल. राज्य सरकारदेखील सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्नरत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कनव्हर्जन्स’ परिषदेत व्यक्त केले होते. त्यानंतर आता आर्थिक पाहणी अहवालातही हे चित्र स्पष्ट झाले. तसे असले तरी उत्पादन क्षेत्रातील वाढ कायम असेल. गुंतवणूकदारांना उत्पादन क्षेत्रातच रस आहे, असे सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख निनाद करपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले.

जीडीपीतील वाटा
क्षेत्र राज्य देश
सेवा ५४.५ ५१.७
उद्योग ३३.६ ३०.४
कृषी
व संलग्न ११.९ १७.९

Web Title: The service sector has grown production-agriculture overcomes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.