फायलींच्या निपटा-याचे आता अधिका-यांना वेळापत्रक; सामान्यांना भेटून सहकार्य करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:49 AM2018-02-16T03:49:46+5:302018-02-16T03:50:00+5:30

मंत्रालयापासून तालुक्यांच्या कार्यालयांपर्यंत सामान्य माणसांची सुनावणी नीट होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्याची दखल घेत आज सामान्य प्रशासन विभागाने काही निर्देश जारी करीत, ‘सामान्यांना भेटा, त्यांना नीट सहकार्य करा, असा सल्ला अधिका-यांना दिला आहे.

Schedule of files disposed of; Instructions to co-operate with the people | फायलींच्या निपटा-याचे आता अधिका-यांना वेळापत्रक; सामान्यांना भेटून सहकार्य करण्याचे निर्देश

फायलींच्या निपटा-याचे आता अधिका-यांना वेळापत्रक; सामान्यांना भेटून सहकार्य करण्याचे निर्देश

googlenewsNext

मुंबई : मंत्रालयापासून तालुक्यांच्या कार्यालयांपर्यंत सामान्य माणसांची सुनावणी नीट होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्याची दखल घेत आज सामान्य प्रशासन विभागाने काही निर्देश जारी करीत, ‘सामान्यांना भेटा, त्यांना नीट सहकार्य करा, असा सल्ला अधिकाºयांना दिला आहे. तसेच फायलींचा निपटारा किती दिवसांत करावा, याचे वेळापत्रकही जारी केले.
मंत्रालयीन अधिकाºयांनी २.३० ते ३.३०, उपविभागीय व त्यावरील अधिकाºयांनी सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दु. ३ ते ५ अभ्यागतांच्या भेटीस राखून ठेवावा, भेटीच्या वेळा बोर्डावर लावाव्यात, असे बजावले आहे. या आदेशाची अंमलबजावणी १८ एप्रिलपासून केली जाणार आहे.

- प्रत्येक शासकीय कार्यालयातील लिपिकाने त्याने केलेल्या
कामाचा साप्ताहिक आढावा त्याच्या कार्यालय प्रमुखास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकाºयाने त्याच्याकडील
फायलींचा पूर्ण निपटारा करून झीरो पेन्डन्सी आणली आहे का
याचे मूल्यांकन हा त्याच्या वार्षिक गोपनीय अहवालाचा भाग समजला
जाईल.

- कोणत्याही कार्यालयात आलेल्या प्रकरणाचा निपटारा किती दिवसांच्या आत करावा याबाबतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
झीरो पेन्डन्सीचे वेळापत्रक
कार्यालयाचा क्षेत्रीय कार्यालयाची आवश्यकता क्षेत्रिय कार्यालयाची
स्तर नसेल तेव्हा (कार्यविवरण) आवश्यकता असेल तेव्हा
मंडळ १५ दिवस -
तालुका ७ दिवस एक महिना
उपविभाग ७ दिवस दोन महिने
जिल्हा ७ दिवस तीन महिने
विभागीय/ ७ दिवस चार महिने
प्रादेशिक
राज्य ७ दिवस पाच महिने

Web Title: Schedule of files disposed of; Instructions to co-operate with the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.