अडचणीत असलेल्या जिल्हा बँका वाचवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:53 AM2018-10-11T00:53:05+5:302018-10-11T00:53:26+5:30

जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 Save the District Banks in Distress - Chief Minister Devendra Fadnavis | अडचणीत असलेल्या जिल्हा बँका वाचवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडचणीत असलेल्या जिल्हा बँका वाचवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बँकेच्या मुख्यालयात बुधवारी साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शेतकºयांना राष्टÑीयीकृत बँक कधीच आपली वाटत नाही. त्याचा फक्त जिल्हा बँकेवर विश्वास असतो. त्यामुळे ही बँक संकटात आली की शेतकरी अडचणीत येतात. ज्या जिल्हा बँका डबघाईस आल्या त्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्या अधिक असल्याचे आजवर दिसले आहे. त्यामुळेच संकटातील जिल्हा बँकांना आता राज्य सहकारी बँकेने वाचवायला हवे. त्यासाठी राज्य सरकार शक्य असेल ती मदत करेलच.
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शिखर बँकेच्या शाखा मुंबईत कशाला हव्यात. त्याऐवजी या शाखा ग्रामीण भागात हलवा, अशी सूचना त्यांनी दिली.
बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळातील सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे यांच्यासह बँकेचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

भागभांडवलाबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन
राज्य सहकारी बँकेत सध्या राज्य सरकारचे १०० कोटी भागभांडवल आहे. त्यावर बँकेकडून सरकारला दरवर्षी १० कोटी रुपयांचा लाभांश दिला जात आहे. जिल्हा बँकांना वाचविण्यासाठी बँकेला आता झपाट्याने विस्तार करायचा आहे. त्यासाठी निधीच गरज असल्याने राज्य सरकारने हे भागभांडवल किमान २०० कोटींनी वाढवावे, अशी इच्छा प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली. पण मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलले नाहीत. त्यामुळे प्रशासकांचा हिरेमोड झाला.

Web Title:  Save the District Banks in Distress - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.