रेल्वेने केली १४ कोटी लिटर पाण्याची बचत

By Appasaheb.patil | Published: June 7, 2019 12:42 PM2019-06-07T12:42:42+5:302019-06-07T12:42:48+5:30

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचा उपक्रम; दुष्काळात रेल्वेला दिलासा, पुर्नप्रक्रिया करून पुन्हा वापरले पाणी

Save 14 crores liters of water by the Railways | रेल्वेने केली १४ कोटी लिटर पाण्याची बचत

रेल्वेने केली १४ कोटी लिटर पाण्याची बचत

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने मागील वर्षात दूषित पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून तब्बल १४ कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे. एवढेच नव्हे तर ७५ हजार झाडे लावून वृक्षसंवर्धनाला गती देण्याचे कामही रेल्वे विभागाने सुरू केल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के. नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

भारतीय रेल हा भारत सरकारचा महत्त्वपूर्ण विभाग आहे़ या विभागातील सोलापूर विभागाने सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात ५ लाख लिटर, दौंड रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर व वाडी रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर क्षमतेचा पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट उभा केला आहे़ या प्रोजेक्टच्या माध्यमातून रेल्वेतील वापरण्यात आलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात आणण्याचे काम सोलापूर विभागाने मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे आतापर्यंत १४ कोटी लिटर पाण्याची बचत या माध्यमातून झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

सौरऊर्जेद्वारे १६ हजार युनिट विजेची निर्मिती
- आजच्या जीवनामध्ये ऊर्जेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. ऊर्जेच्या पारंपरिक आणि अपारंपरिक साधनांचा काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या ऊर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. हाच धागा पकडून सोलापूर रेल्वे विभागाने सोलापूर विभागात ४ हजार ४०० एलईडी बल्ब लावले आहेत़ ज्यातून वर्षाला १३ लाख ८ हजार ७८० युनिटची बचत रेल्वेची होत आहे़ शिवाय भैय्या चौकात असलेल्या रेल्वे हॉस्पिटलवर १० किलो मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे वर्षाकाठी १६ हजार युनिटचे उत्पादन होत आहे़ ज्यामुळे १ लाख ४४ हजार रुपयांची बचत होत असल्याचेही व्ही. के. नागर यांनी सांगितले.

वृक्षसंवर्धनाला प्राधान्य
- आपण निसर्गाचे काहीतरी देणं लागतो, या बांधिलकीतून सोलापूर रेल्वे विभागाने विभागांतर्गत येणाºया विविध रेल्वे स्टेशनवर वर्षभरात ७५ हजार झाडे लावली आहेत़ या झाडांचे संगोपन व निगा राखण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाºयांनी घेतल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के़ नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रेल्वे विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत़ भविष्यात १० रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प व ६ नवे पाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभाकरण्याचा मानस आहे़ लवकरच या कामांना सुरुवात होईल
- व्ही़. के़ नागर, 
अपर रेल्वे मंडल प्रबंधक,
 सोलापूर विभाग

Web Title: Save 14 crores liters of water by the Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.