चंद्रकांत पाटलांनी सांगितला पवारांसाठी 'सेफ' मतदारसंघ; अन्यथा हरविण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:22 PM2019-02-08T18:22:29+5:302019-02-08T18:23:13+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली.

'Safe' constituency for Pawar, told by Chandrakant Patil; Otherwise the pawar will lost | चंद्रकांत पाटलांनी सांगितला पवारांसाठी 'सेफ' मतदारसंघ; अन्यथा हरविण्याचा इशारा

चंद्रकांत पाटलांनी सांगितला पवारांसाठी 'सेफ' मतदारसंघ; अन्यथा हरविण्याचा इशारा

Next

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढणार या चर्चेवर महसूल मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनी पवारांना हरविण्याचा दावा केला आहे. तर त्यांनी शरद पवार यांच्यासाठी सेफ मतदारसंघही कोणता असेल हे सांगून टाकले आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. यावर पवार यांनी विचार करणार असल्याचे सांगितल्याने राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली आहे. 


यावर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधान आले असून नेहमीच विविध विधानांनी चर्चेत असणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांना माढा मतदारसंघात हरवण्याची भाषा केली आहे. कारण माढा मतदारसंघात भाजपने संघटना मजबूत केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांच्यासाठी बारामती हा सेफ मतदारसंघ असून तेथून ते निवडून येतील, असेही त्यांनी सुचविले आहे. 
 

Web Title: 'Safe' constituency for Pawar, told by Chandrakant Patil; Otherwise the pawar will lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.