'आरटीओ’ निरिक्षकचे 'फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल' अकाऊंट 'हॅक‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 05:22 PM2017-08-20T17:22:46+5:302017-08-20T17:28:39+5:30

सायबर क्राईम हा आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील एक अत्यंत ज्वलंत समस्या बनली आहे. बॅँकेचे पिन पासून सोशल मिडियाच्या अकाऊं टपर्यंत अन् बॅँकांच्या एटीएमसह सरकारी वेबसाईटवरही हॅकर्सने वक्रदृष्टी केली आहे. असाच एक प्रकार रविवारी नाशिकमध्ये उघडकीस आला.

'RTO Observer's' Fitness Verification Application' Account 'Hack' | 'आरटीओ’ निरिक्षकचे 'फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल' अकाऊंट 'हॅक‘

'आरटीओ’ निरिक्षकचे 'फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल' अकाऊंट 'हॅक‘

Next
ठळक मुद्देअकाऊंट हॅक करुन त्यांच्या नावाने लॉगिन हॅकर्सने दोन वाहनांना विना तपासणी प्रमाणपत्र बहाल केल्याचे उघडकीस आले सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल मोटार परिवहन निरिक्षक हेमंत गोविंद हेमाडे यांचे अकाऊंट हॅक

नाशिक : सायबर क्राईम हा आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील एक अत्यंत ज्वलंत समस्या बनली आहे. बॅँकेचे पिन पासून सोशल मिडियाच्या अकाऊं टपर्यंत अन् बॅँकांच्या एटीएमसह सरकारी वेबसाईटवरही हॅकर्सने वक्रदृष्टी केली आहे. असाच एक प्रकार रविवारी नाशिकमध्ये उघडकीस आला. एका ना अनेक कारणाने चर्चेत राहणारे आरटीओ’चे कार्यालय यामुळे पुन्हा चर्चेत आले. हॅकर्सने फिटनेस व्हेरिफिके शन करणारी वेबसाईट हॅक करुन थेट संबंधिताला प्र्रमाणपत्र बहाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, आरटीओचे व्यवसाय मोटार परिवहन निरिक्षक हेमंत गोविंद हेमाडे (४९) हे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करीत असताना स्वयंचलित यंत्रावर वाहने न आणता कुठल्याही प्रकारची तपासणी न करता थेट दोन वाहनास फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल प्रमाणपत्र मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे अकाऊंट हॅक करुन त्यांच्या नावाने लॉगिन करत संबंधित हॅकर्सने दोन वाहनांना विना तपासणी प्रमाणपत्र बहाल केल्याचे उघडकीस आले आहे. हेमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधित तपास सायबर पोलीस करीत आहेत.

Web Title: 'RTO Observer's' Fitness Verification Application' Account 'Hack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.